एकशिव पाणी वापर संस्थेमधील भ्रष्टाचाराबाबत अधीक्षक अभियंता यांना कार्यकारी अभियंता यांचे पत्र.

माळशिरस तालुक्यातील एकशिव पाणी वापर संस्थेतील अपहार प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर, संचालक मंडळ फिर्यादी तर सचिव आरोपी आहे.

नातेपुते ( बारामती झटका )

पुणे पाटबंधारे मंडळ पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता नीरा उजवा कालवा फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता सं.रा. बोडखे यांनी एकशिव पाणी वापर संस्था एकशिव ता. माळशिरस संस्थेमधील भ्रष्टाचाराबाबत पत्र दिलेले आहे. त्यामध्ये संदर्भीय तीन पत्राचा दिलेला आहे.

एकशिव पाणी वापर संस्था एकशिव, ता. माळशिरसचे चेअरमन व संचालक मंडळातील सदस्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी द्यावी व सविस्तर अभिप्राय अहवाल मंडळ कार्यालयास सादर करण्यास विभागास कळविले होते. त्यानुसार विभागीय कार्यालयाने चेअरमन एकशिव पाणी वापर संस्था यांना दि.११/७/२०२२ रोजी स. ११ वा. विभागीय कार्यालयात बैठकीस व म्हणणे मांडण्यास संधी दिली. त्यातून त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले व लेखी निवेदनही दिले.

त्यांच्या निवेदनामधील बाबींचा अभ्यास केला असता सदर प्रकरणांमध्ये संचालक मंडळाचे तत्कालीन सचिव दादा जगू दडस यांच्यावर नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये रीतसर दि. ३/१२/२०२१ रोजी फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे तपास होऊन पोलिसांनी सर्व संचालक, साक्षीदार व सर्व अभिलेख यांची चौकशी केली. त्यावेळी सचिव यांनी जमा पावती देऊन पाणीपट्टी महसूल वसूल केला. परंतु, संस्थेच्या बँक खात्यात भरला नाही, असे निदर्शनास आले. हिशोबामध्ये दैनंदिन किर्द लिहीताना सचिव दादा दडस यांनी अपहाराची शिल्लक रक्कम त्यांच्याजवळ ठेवली आहे, असे लेखी लिहून दिले आहे.

सदर हिशोबाचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. ऑडिटर एस. व्ही. कोळी, पंढरपूर यांनी दि. १/४/२०१८ ते ३१/३/२०२१ अखेर ३ वर्षांचे ऑडिट केले आहे. त्यामध्ये सचिव यांच्याकडे ११,३५,१९३/- रु. एवढी रक्कम अपहार केल्याचे अहवालात लेखी म्हणणे दिले आहे. त्यानंतर पोलिसांनी दादा दडस यांना अटक करून माळशिरस न्यायालयात आयपीसी ४०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये त्यांना पोलीस कस्टडी मिळाली होती. त्याबाबतचे एफ आर आय व कोर्टाने दिलेले आदेश यांच्या दि. ७/४/२०२२, ८/४/२०२२, ११/४/२०२२ च्या प्रती सोबत जोडल्या आहेत. सध्या आरोपी दादा दडस जामिनावर सुटलेला आहे.

सदर प्रकरण सध्या माळशिरस कोर्टात सुरू आहे. सदर अपहार प्रकरण संचालक मंडळाने पाठपुरावा करून शोधून काढले व पाटबंधारे विभागास कळविले. दादा दडस यांच्याविरुद्ध पोलीस फिर्याद दिली व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये पोलिसांनी सर्व संचालकांचे जबाब घेतले आहेत व चौकशी केली आहे. पोलीस तपासात संचालकांविरुद्ध कसलाही आक्षेप आलेला नाही किंवा संचालक मंडळ यामध्ये सामील आहे असे निष्पन्न झाले नाही. सदर प्रकरणात संचालक मंडळ फिर्यादी आहे व सचिव आरोपी आहेत, हे तपासांती सिद्ध झाले आहे.

वरील सर्व बाबींची शहानिशा केली असता, संपूर्ण मंडळ जबाबदार नसून सचिव दादा जगू दडस हे जबाबदार आहेत, असे स्पष्ट दिसून येत आहे. तसेच संस्थेचा कालावधी संपल्याने संस्थेचा निवडणूक कार्यक्रम दि. ६/६/२०२२ पासून सुरू झाला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleओबीसीचे आरक्षण मिळाल्याबद्दल वेळापूर सोसायटीत पेढे भरवून आनंदोत्सव साजरा
Next articleराष्ट्रध्वजाची उभारणी करून उपक्रमात सामील होण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here