कल्याणशेट्टी भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष, धैर्यशील, विजयराज यांना संधी नाही

प्रदेशाध्यक्षांनी केली घोषणा, फडणवीस यांची पसंती असल्याची चर्चा

सोलापूर (बारामती झटका)

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ही निवड जाहीर केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष पद श्रीकांत देशमुख यांच्याकडे होते.

एका महिलेसोबत वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने त्यांना पदावरून दूर केले. महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजपचे सरकार आल्यानंतर काही दिवसातच ही घडामोड झाली होती. देशमुखांच्या या व्हिडिओमुळे भाजप संघटनेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे कोणत्याही वादात नसलेल्या व्यक्तींना पद दिले जावे, असा सूर निघाला.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत नवा जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा विषय बाजूलाच राहिला. भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांच्या नावांची चर्चा भाजपमधून होती. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन कल्याणशेट्टी यांना पसंती दिल्याची चर्चा आहे. कल्याणशेट्टी यांच्या नावाची घोषणा मंगळवारी झाली.

कल्याणशेट्टी यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना भाजपच्या संघटनेत संधी मिळाली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करू, पक्ष संघटन मजबूत करू, असे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगाथामूर्ती ह.भ.प. श्री. रामभाऊ महाराज राऊत यांचे मळोली ता. माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केलेले आहे.
Next articleनातेपुते येथे श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here