कै. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात पोहचली – बाळासाहेब सरगर

माळशिरस ( बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे जी शहरापर्यंत मर्यादित होती ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली, असे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त माळशिरस भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये बोलताना व्यक्त केले. आज माळशिरस येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कै. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन माळशिरस भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष राजेंद्र वळकुंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमासाठी माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक आकाश सावंत, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, अमोल वाघमोडे, गणेश सिद, पत्रकार संजय हुलगे, अमोल राऊत, सुनील बंडगर, मोहन गोरड, प्रविण राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब सरगर म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्ष यात्रेमुळे १९९५ साली राज्यांमध्ये शिवसेना-भाजप सरकार आलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते माळशिरस तालुक्यातील २२ गावाला वरदानी ठरणारे निरा देवधर धरणाचे भूमिपूजन त्यांच्या शुभहस्ते होऊन कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मार्फत या तलावाचे काम १९९९ साली पूर्ण करण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या सदैव स्मरणात राहणारे काम गोपीनाथ मुंडे यांनी केल्यामुळे त्यांच्या स्मृती आजही जाग्या होतात, असे प्रतिपादन बाळासाहेब सरगर यांनी व्यक्त केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleThe Board Place
Next articleचि. किरण वाघमोडे आणि चि.सौ.कां. मयुरी शेंडगे यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here