गोरडवाडी-तरंगफळ रस्त्याची दुरुस्ती करा – संजय कोळेकर

गोरडवाडी ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी-तरंगफळ गावाला जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी संजय कोळेकर यांनी केली आहे. गोरडवाडी येथून तरंगफळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तरंगफळ गावच्या रस्त्यांची व गोरडवाडी रस्त्याची अगदी चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे हा रस्ता रहदारीस धोकादायक आणि त्रासाचा ठरत आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या ९ किलोमिटर अंतरावर असलेल्या या रस्त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

नागरिकांना नोकरी, व्यवसाय, मजुरी, दवाखाना, शिक्षण यासाठी दररोज तरंगफळ येथे ये-जा करावी लागते. मात्र या रस्त्याने दुचाकी नेणेच मोठे अवघड असून चारचाकी वाहन घेऊन जाणे, म्हणजे मोठी कसरतच आहे. त्यामुळे संबंधीत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरित लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी संजय कोळेकर यांनी केली असून या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नागनाथ दगडे यांची निवड…
Next articleभारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात मुंबई महिलेने लावला हानीट्रॅप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here