ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद, दिग्गज पराभवांच्या छायेत.

माळशिरस तालुक्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, काही ग्रामपंचायतीत सत्ता बदल तर काही ग्रामपंचायतीवर सत्ता कायम…

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. निकालाची उत्कंठा लागली असून त्यामध्ये काही ग्रामपंचायतीत थेट जनतेतील सरपंच व सदस्य बिनविरोध झालेले आहेत. उर्वरित ३४ गावातील थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे मतदान होऊन अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेले आहे. अनेक दिग्गज पराभवाच्या छायेत आहेत. माळशिरस तालुक्यात चुरशीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लगण्याची शक्यता आहे. काही ग्रामपंचायतीत सत्ता बदल तर काही ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राहतील अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.

माळशिरस तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीपैकी २२ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाचे उमेदवार आमने-सामने आहेत. माळेवाडी बोरगाव सहा उमेदवार, तर तरंगफळ येथे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उर्वरित ठिकाणी तीन चार असे उमेदवार उभे राहिले आहेत. वेळापूर ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच तिसरी आघाडी झालेली असल्याने त्या आघाडीचा फटका सत्ताधारी ? कि विरोधक ? यांना बसणार आहे. उघडेवाडी व तांबेवाडी या दोन गावात सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत फक्त सरपंच पदाची समोरासमोर लढत लागलेली होती.

ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अनेक माजी सरपंच, उपसरपंच निवडणूक रिंगणात आहेत. थेट जनतेतील निमगाव मगराचे गावच्या सरपंच असणाऱ्या सौ. आरती मगर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उभ्या आहेत. मेडद गावचे थेट जनतेतील माजी सरपंच युवराज झंजे यांच्या धर्मपत्नी बायडाबाई ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उभ्या आहेत. खंडाळीचे माजी सरपंच बाबुराव पताळे, काळमवाडीचे माजी सरपंच व शिवामृतचे माजी संचालक दादासाहेब शिंगाडे यांच्यासह अनेक आजी माजी सरपंच निवडणुकीत उभे आहेत. सदाशिवनगर येथे माजी उपसरपंच वीरकुमार दोशी व माजी उपसरपंच माणिक सुळे पाटील यांच्यामध्ये सरपंच पदाची लक्षवेधी निवडणूक लागलेली आहे.

माळशिरस तालुक्यात शांततेत व निर्भयपणे मतदान पार पडलेले आहे. मतदारांना लक्ष्मी दर्शन व मनपसंत भोजनाचा आस्वाद उमेदवारांनी दिलेला आहे. दोन्ही गटाकडून लक्ष्मी दर्शन घेतलेले कोणाच्या पारड्यात मतदान टाकतील यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleUsing Technology to Enhance Math and Technologies in their classroom
Next articleपुरोगामी विचारांच्या वसुंधरा सरनोबत–सरकार यांचे निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here