चि.सौ.कां. काजल ठवरे आणि चि. अजित नरूटे यांचा शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. मच्छिंद्र ठवरे, खुडूस आणि श्री. जालिंदर नरूटे, मोहोज यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार

खुडूस (बारामती झटका)

श्रीमती पार्वतीबाई व कै. विठ्ठल भाऊ ठवरे यांची नात व सौ. निलावती व श्री. मच्छिंद्र विठ्ठल ठवरे, रा. खुडूस, ता. माळशिरस यांची सुकन्या चि.सौ.कां. काजल (D.Pharm., B.A.) आणि श्रीमती सीताबाई व कै. किसन भाऊराव नरूटे यांचे नातू व सौ. सुभद्रा व श्री. जालिंदर किसन नरूटे, रा, मोहोज देवढे, ता. पाथर्डी यांचे चिरंजीव अजित (Civil Engineer) यांचा शुभविवाह सोहळा शुक्रवार दि. २७/१/२०२३ रोजी सायंकाळी ६.११. मिनिटे या गोरज मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, अकलूज-माळशिरस रोड, 61 फाटा, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

तरी या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरांना अक्षतारुपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ठवरे परिवार यांचेकडून करण्यात आले आहे.

लग्नाच्या घाई गडबडीत, नजरचुकीने आपणांस आमंत्रण, निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे अशी नम्र विनंती, प्रेषक सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता गणपत विठ्ठल ठवरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र विठ्ठल ठवरे आणि समस्थ ठवरे परिवार यांच्यावतीने करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleग्रामीण रुग्णालयात रुग्णाला चांगली सेवा देऊन बरे होण्याचा आत्मविश्वास निर्माण करा – शिवाजीराव सावंत
Next articleतरंगफळच्या माजी सरपंच रत्नमाला तरंगे यांचा प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here