चि. हनुमंत सरगर, गिरवी आणि चि.सौ.कां. प्रतीक्षा ढवळे, धुळदेव यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार.

माळशिरस तालुक्यातील गिरवी गावातील बाळासाहेब सरगर आणि माण तालुक्यातील धुळदेव गावातील महादेव ढवळे दोन परिवारांचे ऋणानुबंध रेशीमबंधाच्या गाठीमध्ये जुळणार नाते.

माळशिरस ( बारामती झटका )

स्व. झक्कू दादू सरगर यांचे नातू व श्री. बाळासाहेब झक्कू सरगर रा. गिरवी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव हनुमंत सरगर आणि श्री. पोपट पांडुरंग ढवळे यांची नात व श्री. महादेव पोपट ढवळे, रा. धुळदेव, ता. माण यांची जेष्ठ सुकन्या चि.सौ.कां. प्रतीक्षा उर्फ छकुली ढवळे यांचा शुभविवाह सोमवार दि. 29/8/2022 रोजी दुपारी २ वाजून १५ मिनिटे या शुभ मुहूर्तावर अग्नी देवाच्या साक्षीने, रेशमाच्या बंधनात वाद्यांच्या गजरात, सुर सनईच्या मधुर सुरात, मु.पो. गिरवी नजीक सरगर वस्ती, पिसे वस्ती रोड, पाणी टाकीजवळ, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

तरी आपण अशा पवित्र मंगल क्षणी शुभ आशीर्वाद देण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे श्रीमती शांताबाई झक्कू सरगर, सौ. कांताबाई व श्री. महादेव झक्कू सरगर, सौ. मंगलबाई व श्री. बाळासाहेब झक्कू सरगर, चि. राहुल महादेव सरगर आणि समस्त सरगर परिवार गिरवी यांच्यावतीने नातेवाईक व मित्रपरिवार यांना विवाह प्रसंगी उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाई गडबडीत आपणांस हस्ते पर हस्ते आमंत्रण व निमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजरचुकीने निमंत्रण अथवा आमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून शुभ विवाह मंगल कार्यास येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन समस्त सरगर परिवार गिरवी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदहिगाव येथे श्री. मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप
Next articleबांगर्डे येथील जन सुविधा योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी – युवानेते पांडुरंग किसवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here