जांबुड ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी श्री. सुहास पांडुरंग यादव यांची बिनविरोध निवड

जांबुड (बारामती झटका)

जांबुड ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुहास पांडुरंग यादव यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झालेली आहे. माळशिरस पंचायत समिती मधील कृषी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. एन. एच. चव्हाण यांच्या उपस्थितीत व थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच तथा अध्यक्षा सौ. स्वातीताई राहुल खटके यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 9 जानेवारी 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच पदाची निवडणूक नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली. श्री. सुहास पांडुरंग यादव यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आलेला असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण साहेब यांनी बिनविरोध उपसरपंच पदाची घोषणा केली. त्यांना ग्रामविकास अधिकारी तथा सचिव हनुमंत संपतराव वगरे यांनी सहकार्य केले.

जांबुड ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. स्वातीताई राहुल खटके, ग्रामपंचायत सदस्य केचे शिवाजी नारायण, बेलदार पुष्पा हनुमंत, पवार वर्षाराणी सत्यवान, चंदनशिवे सचिन श्रीमंत, खटके भीमराव दगडू, अडसूळ जयश्री अर्जुन, थोरात बिरुदेव रामचंद्र, भोसले भाग्यश्री रामचंद्र, यादव सुहास पांडुरंग, भोसले मंजुळा अभिमन्यू, माने सुजाता दादासाहेब, कचरे विश्रांती वसंत, नाईकनवरे अतुल हनुमंत असे सरपंचासह 14 सदस्य उपस्थित होते.

सर्वप्रथम अध्यासी अधिकारी तथा सरपंच सौ. स्वातीताई राहुल खटके यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत करून निवडणुकीला प्रारंभ झाला. एकमेव अर्ज आलेला असल्याने बिनविरोध उपसरपंच पदी श्री. सुहास पांडुरंग यादव यांची घोषणा करण्यात आली. यावेळी नरसिंह ग्रामविकास पॅनलचे मार्गदर्शक माजी सरपंच शिवाजी कचरे, माजी चेअरमन बबनराव खटके, हरिदास कचरे, मुरलीधर कचरे, प्रकाश केचे, किसन भोसले, विद्यमान चेअरमन राहुल खटके, प्रशांत मिसाळ, मुन्ना शेख, बापूराव मोरे, विजय वेदपाठक, अर्जुन अडसूळ, माणिक गुळूमकर, सुमित भोसले, भीमराव गायकवाड, विजय कचरे, विजय केचे, रावसाहेब कदम, हर्षद हुंबे यांच्यासह गावातील आजी-माजी पदाधिकारी, नेतेमंडळी, उत्साही तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिनविरोध उपसरपंच पदी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषणा करताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसदाशिवनगरचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच वीरकुमार दोशी यांनी प्रकल्प संचालकाची भेट घेतली.
Next articleमेडद ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या निर्णायक मतामुळे संदीप जाधव यांचा उपसरपंच निवडणुकीत विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here