जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी पांडुरंग सुर्यवंशी तर सरचिटणीस पदी आनंद टेके

माळशिरस (बारामती झटका)

आज दि.०६/०३/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ माळशिरस तालुका कार्यकारिणी निवड पंचायत समिती माळशिरस येथे संपन्न झाली. त्यामध्ये श्री. पांडुरंग सुर्यवंशी यांची माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणुन तर श्री. आनंद टेके यांची सरचिटणीस म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते, ग्रामीण पाणी पुरवठा उप विभागाचे उप अभियंता बाबर साहेब व महाराष्ट्र राज्य प्रशासन अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा पंचायत समिती माळशिरसचे तत्कालीन सेवा निवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी अजितकुमार देशपांडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी भारत कदम, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्र बुगड, परिचर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश मालखरे, तसेच कर्मचारी महासंघाचे विभागीय सह सचिव दिनेश बनसोडे, जिल्हा अध्यक्ष राजेश देशपांडे, लिपीक वर्गीय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे मानद जिल्हा अध्यक्ष सचिन सोनकांबळे, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद साठे, जिल्हा सल्लागार हनुमंत भोसले, पंढरपूर तालुका अध्यक्ष धन्यकुमार काळे, कुर्डुवाडी तालुका अध्यक्ष येळे, माळशिरस तालुका अध्यक्ष राजाभाऊ राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, एकत्र लढल्यास चमत्कार घडेल…
Next articleआरोग्य कुटुंब कल्याणमंत्री तानाजीराव सावंत यांनी स्व. संजय सावंत यांच्या कुटुंबियांना केली मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here