दौलतनाना शितोळे यांना शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त मिळावा, जय मल्हार क्रांती संघटनेची मागणी

माळशिरस (बारामती झटका)

जय मल्हार क्रांती संघटना रामोशी, बेरड, बेडर समाजाचे राष्ट्रीय नेते लोकनेते दौलतनाना शितोळे यांना कायमस्वरूपी शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी ॲड. एम. एम. जाधव, ॲड. व्ही. एस. मंडले आणि शंकर चव्हाण यांनी माळशिरस तहसील कार्यालयातील तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. सराईत गुन्हेगार शमशुद्दीन विराणी रा. कल्याणनगर पुणे, सचिन उर्फ पप्पू घोलप रा. धनकवडी पुणे, पप्पू उकिरडे रा. सणसवाडी शिरूर, केतन मल्लव रा. शिरूर पुणे, सनी यादव रा. वाघोली पुणे, यांच्यावर मोक्का एम.पी.डी. अंतर्गत कारवाई करण्याची देखील मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जय मल्हार क्रांती संघटना रामोशी, बेरड, बेडर समाजाचे राष्ट्रीय नेते लोकनेते दौलतनाना शितोळे हे महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर तसेच बहुजन समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत. दौलतनाना शितोळे यांनी समाजाच्या न्याय हक्कांसाठी गेली सात वर्ष खूप मोठा लढा दिला आहे व समाजाला न्याय मिळवून दिला आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या ७० लाख रामोशी, बेरड, बेडर समाज बांधवांच्या मनावर अधिराज्य करणारे जननायक, लोकनेते आहेत. दौलतनाना शितोळे यांना गेली चार ते पाच वर्षांपासून वरील नमूद केलेल्या गुन्हेगारांकडून त्रास सुरू आहे. यामध्ये कंपनीच्या कामांमध्ये हस्तक्षेप करणे, मासे व्यवसायाच्या घोडधरण मध्ये हस्तक्षेप करणे, त्यांचा अनेक वेळा ट्रॅप लावणे, त्यांना अनेक वेळा जिवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकारचे त्रास दिले जात आहेत.

याबाबत अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वरील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत व दौलतनाना शितोळे यांना पोलीस बंदोबस्त मागणीबाबत परिसर पाठपुरावा केला आहे. आता वरील सराईत गुन्हेगारांनी थेट फोनवरून खंडणी मागत जीवे मारण्याची धमकीच दिली आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम ७० लाख समाज बांधवांच्यावतीने विनंती आहे की, वरील सर्व सराईत गुन्हेगार असून या गुन्हेगारांना मोका एमपीडी अंतर्गत कारवाई करून कठोर शासन करावे‌. तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांचे सर्व कुटुंबीय व जय मल्हारच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना वरील सराईत गुन्हेगारांकडून धोका आहे. त्यामुळे दौलतनाना शितोळे यांना कायमस्वरूपी शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांची मागणी आहे. वारंवार पोलीस अधिकारी यांना याबाबत सर्व माहिती दिली आहे.

यापुढे दौलतनाना शितोळे साहेब यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास याला सर्वस्व पोलीस खाते जबाबदार राहील. त्यामुळे तमाम समाज बांधवांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिकट्रस्टच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर
Next articleशासकीय सवलतींसाठी कोणी बनले बहिरे तर कोणी आंधळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here