नातेपुते मंडळमध्ये महिला शेतीशाळेचा शुभारंभ

नातेपुते (बारामती झटका)

कृषि क्षेत्र, संलग्न क्षेत्र व कृषि उत्पादनात महिलाची मदत सहभाग अनन्यसाधारण आहे. जमिन तयार करणे ते प्रक्रिया, मुल्यवर्धन घटकामध्ये महिलांचा यशस्वी व मोलाचा सहभाग आहे. कृषि तंत्र, मंत्र, विज्ञान, सुत्रे महिलांना अवगत करणे त्यांना शिकविणे ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज बघून मंडळ कृषि अधिकारी, नातेपुते कार्यक्षेत्रातील २६ गावांमधील कोथळे व दहीगाव – ज्वारी पिक, कारुंडे – मका या पिकांची राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टीक धान्य व कडधान्य विकास कार्यक्रमातून व पळसमंडळ येथे हरभरा या पिकाची क्रॉसॅप अंतर्गत फक्त महिला शेतकरी लाभार्थीची शेतीशाळा ९० दिवसाची ७ वर्गाची शेतीशाळा घेण्याचे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांनी अभिनव उपक्रम राबविण्यासाठी हाती घेण्यात आला आहे.

या गावातील प्रत्येकी ३० महीला शेतकरी लाभार्थीची निवड करून संबंधीत पीकाची जमिन निवड व तयार करणे, पीक वाण निवड, बीजप्रक्रिया, दोन चांडे पाभरने खत व बियाणे पेरणी, एकात्मीक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, पीक स्पर्धा, काढणी व मुल्यवर्धन या बाबींवर सविस्तर महिती, मार्गदर्शन, सल्ला, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मौजे कोथळे येथे रब्बी ज्वारी शेतीशाळा वर्ग – ३ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आला. या वर्गाला गावातील ३८ शेतकरी महिलांनी सहभाग नोंदविला. या वर्गामध्ये श्री. सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांनी ज्वारी एकात्मिक किड व रोग नियंत्रण जैविक भौतीक रासायनिक घटक याबाबत महिती व मार्गदशन केले. श्री. उदय साळूंखे यांनी कामगंध सापळे व त्याचा वापर याबाबत महिती दिली. श्री. पांडूरंग माने यांचे ज्वारी पीक प्रक्षेत्रात प्रत्यक्ष भेट देऊन कामगंध सापळे लावणे व ज्वारीवरील किड व रोग ओळख याबाबत महिती देण्यात आली. या कार्यक्रमास गावातील प्रगतशील शेतकरी श्री. दत्तात्रय माने, उपसरपंच श्री. माने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन, नेटके नियोजन कृषि मित्र श्री. पांडूरंग माने यांच्या सहाय्याने श्री‌ लालासाहेब माने कृषी सेवक यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्री. विजय कर्णे कृषि सहाय्यक यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता चहापान व नाष्ट्याने झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकोविड मंदीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गरोदर महिलांसाठी ठरतेय नवसंजीवनी…
Next articleसोलापूर जिल्हा तालीम संघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्रीनिवास कदम पाटील यांची नियुक्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here