नायगावचे आदर्श सरपंच जितेंद्र पांडुरंग चौधरी यांचा डॉ. दीपक शिकारपूर यांच्याहस्ते सन्मान

पुणे (बारामती झटका) सुनिल ज्ञानदेव भोसले यांजकडून

रोटरी क्लब नारायणगाव हायवे ता. जुन्नर, जि. पुणे, यांच्या सौजन्याने राष्ट्रबांधणीचे शिल्पकार गौरव समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमांमध्ये आपल्या विभागातील समाजकार्यामध्ये तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच नायगांवचे प्रथम नागरिक आदर्श सरपंच श्री. जितेंद्र पांडुरंग चौधरी यांना राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा पुरस्कार रोटरी क्लब मेंबर डॉ. दीपक शिकारपूर पी.डी.जी. संगणक तज्ञ व लेखक यांच्या हस्ते देण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित राजेंद्र चौधरी, पोपट चौधरी, उत्तम घुले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन श्री. रवींद्र वाजगे व श्री. अंबादास वामन संचालक जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था तसेच नारायण आरोटे, नंदकुमार चिंचकर, श्रीकांत फुलसुंदर, शिवाजी टाकळकर, गणेश गोडसे, रामभाऊ सातपुते यांनी केले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरण-धैर्य माढा लोकसभेचे उमेदवार नव्हे तर उमेदवार प्रतिनिधी तरी बनतील का ?
Next articleकरमाळा नगरपालिका प्रशासकीय इमारत व टाऊन हॉलची इमारत २०२५ पर्यंत पूर्ण होणार – महेश चिवटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here