निमगाव ( बारामती झटका)
स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निमगाव मगराचे ता. माळशिरस येथील शिवप्रतिष्ठान व बळीराजा ग्रुपच्या वतीने महाराजांची जयंती पर्यावरण पूरक साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी मल्लसम्राट रावसाहेब मगर हे होते.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मूलांना, नागरिकांना या प्रतिष्ठानाच्यावतीने केशर आंबा रोपांचे मोफत वाटप मान्यवरांच्या हस्ते करुन संगोपनाची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन प्रतिस्ठानच्यावतीने करण्यात आले. यावेळी व्याख्याते आकाश पाटील यांनी महाराजांची प्रत्येक क्षेञात दूरदृष्टी होती, त्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांसमोर मांडला पाहिजे, असे सांगितले.
या शिवप्रतिष्ठानचे दत्ता मगर यांच्या संकल्पनेतून ५०० आंबा रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत मगर, नाळाचीवाडी सेवा संस्थांचे चेअरमन भारत मगर, विष्णुपंत मगर, प्रा. विक्रम मगर, शशिकांत गायकवाड आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर मगर, विजय मगर, मल्हारी गायकवाड यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार संतोष साठे यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng