माळशिरस तहसील कार्यालय व अकलूज प्रांत कार्यालय येथे महसूल प्रशासनात दीर्घकाल सेवा केलेली आहे.
निमगाव (म.) (बारामती झटका)
निमगाव मगराचे ता. माळशिरस येथील दगडू नारायण मिसाळ वय ६३ यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज येथे रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर रविवारी दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी निमगाव-मळोली शिवेवरील त्यांच्या राहत्या घरी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. नायब तहसिलदार या पदावरून सेवानिवृत्त ते झाले होते.
स्व. दगडू मिसाळ यांचे जन्मगाव सांगोला तालुक्यातील चिनके आहे. त्यांची निमगाव मगराचे गावातील प्रगतशील बागायतदार दादासाहेब मगर यांच्या कन्येशी विवाह झालेला होता. यशवंतनगर मधील स्वरूपनगर येथे राहत होते. त्यांनी शेती निमगाव येथे घेतलेली असल्याने परिवारातील सदस्य निमगाव येथे राहत आहेत. त्यांनी माळशिरस तहसील कार्यालयात क्लार्क पदावर नोकरीस सुरुवात केलेली होती. त्यांनी माळशिरस तहसील कार्यालय, अकलूज उपविभागीय कार्यालय, अकलूज मंडल कार्यालय या ठिकाणी अव्वल कारकून या पदावर काम केलेले आहे. त्यांना नायब तहसीलदार पदावर बढती मिळाल्यानंतर दुसऱ्या तालुक्यात बदली झालेली होती. सध्या ते नायब तहसीलदार पदावर सेवानिवृत्त झालेले होते.
महसूल प्रशासनात काम करीत असताना सर्वसामान्य जनतेला अडचणीत मदत करीत होते. सुसंस्कृत स्वभाव असल्याने सर्व परिचित होते. त्यांच्या दुःखद निधनाने निमगाव मगराचे व चिनके गावावर शोककळा पसरलेली आहे. त्यांच्यावर सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. रक्षा विसर्जन (तिसऱ्याचा कार्यक्रम) होणार आहे.
मृतात्म्यास शांती लाभो व परिवारांला दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण श्रद्धांजली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng