पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सेवा पंधरवाडा या अंतर्गत माळीनगर येथे मोदी@20 या पुस्तक प्रकाशन पुर्व नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन

माळीनगर (बारामती झटका)

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा या अंतर्गत माळीनगर येथे मोदी@20 या पुस्तक प्रकाशन पुर्व नोंदणी व पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळेस पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून मोदी @20 या पुस्तक नोंदणीला सुरूवात झाली.

यावेळेस भाजपा माळशिरस तालुका सरचिटणीस सुरज मस्के, अमित पुंज, जालिंदर लिगाडे, विराज निंबाळकर, राजु शिंदे यांच्यासह भाजपा युवा मोर्चा माळशिरस तालुका चिटणीस ज्ञानेश्वर पंचवाघ, भाजपा माळीनगर शहर अध्यक्ष संतोष करंडे, भाजपा किसान युवा मोर्चा माळशिरस तालुका चिटणीस प्रशांत लेंगरे, रुपेश ऐवळे तसेच सवतगाव व माळीनगर मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यात दोन ठिकाणी रक्तदान शिबिर, जल जीवन सप्ताहामध्ये नागरिकांची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छता परिसर सप्ताहामध्ये आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्याचबरोबर २८ सप्टेंबर रोजी फोंडशिरस येथे नेत्रदान शिबिर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आर्थिक नीती व परराष्ट्र धोरण या विषयावर एक तारखेला बुद्धिजीवी लोकांचे संमेलन होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगोरडवाडी येथे ग्रामदैवत बिरोबा यात्रेनिमित्त प्रथमच शेळी मेंढरांची यात्रा भरणार…
Next articleपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडून माळशिरस तालुक्यातील विकासकामांना झुकते माप मिळणार, बॅकलॉग भरून निघणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here