पीएम किसान – ईकेवायसी करा व पीएम किसान प्रलंबीत लाभार्थ्यांनी किसान क्रेडीट कार्डचा लाभ घ्या…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ११६ गावात दि. १३ ऑक्टोबर रोजी किसान क्रेडीट कार्ड पीएम – किसान प्रलंबीत लाभार्थ्याना मिळवून देणेसाठी कृषि विभागाच्यावतीने गावपातळीवरील कृषि अधिकारी कृषी सेवक, कृषि सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांचे मार्फत राबविण्यात येणार आहे.

या मोहीमेअंतर्गत वरील आधिकारी गावपातळीवर उपस्थितीत राहून पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रलंबीत लाभार्थीचे मार्गदर्शन माहितीसह फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. व गावनिहाय लिड बँक गाव दत्तक बँक नुसार त्या त्या बँकेत यादीसह फॉर्म सादर करण्याचे नियोजन आहे. प्रलंबीत लाभार्थ्यांनी ७/१२, ८ अ, आधार कार्ड, बँक पासबुक व फोटो सह उपस्थितीत राहून फॉर्म भरून द्यावयाचा आहे.

या कामी गावपातळीवरील पदाधिकारी कृषिमित्र, आत्मा गट, कृषि उत्पादक कंपन्या, दूध सोसायट्या, क्रेडीट सोसायट्या, कृषि सेवा केंद्र, गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रा. सदस्य यांनी गावपातळीवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार, प्रसिद्धी, प्रसार करून मोहीम राबविण्याबाबत सहकार्य करण्याचे व वंचीतांनी याचा लाभा घेण्याचे आवाहन श्री. सतिश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article२०१४ नंतर देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता रविकांत वरपे
Next articleवेळापूर विकास सोसायटीच्या सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here