पुरंदावडे येथील माऊलींच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळ्याच्या मैदानास उप अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांची सदिच्छा भेट

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील माळशिरस तालुक्यातील पहिले गोल रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी…

पुरंदावडे ( बारामती झटका)

पुरंदावडे ता. माळशिरस येथील या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोहळ्याच्या मैदानास अकलूज उपविभागीय अधिकारी उप अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, लायन कन्सटंटसचे ज्वानी शर्मा, विनोद कवलकर, जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सिनियर इंजिनियर दिलीप शेट्टी, शिवा शेट्टी यांच्यासह पूरंदावडे, सदाशिवनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उप अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी पालखी रिंगण सोहळ्याच्या मैदानाचा आढावा घेतला. पालखी येण्याजाण्याच्या रस्त्यांची पाहणी करून जेणेकरून पालखी सोहळ्याला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याची खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात अशी सूचना केल्या. पालखीतील रिंगण सोहळ्याचा जास्तीत जास्त फायदा वैष्णव व भाविकांना व्हावा यासाठी स्थानिक नागरिक यांनी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

पुरंदावडे ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या या पायी पालखी सोहळा वारीतील माळशिरस तालुक्यातील पहिले गोल रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी केलेली आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सदाशिवनगर ग्रामपंचायत हद्दीत रिंगण सोहळ्याच्या तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावचे सरपंच बाळासाहेब उर्फ देविदास ढोपे, उपसरपंच पुंडलिक पालवे, माजी उपसरपंच संतोष शिंदे, धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचे चेअरमन प्रताप सालगुडे पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुदाम ढगे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे माजी माळशिरस तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे, वस्ताद ज्ञानदेव पालवे, हरिदास राऊत, विश्वजीत सालगुडे, मंगेश कुलकर्णी, अभियंता प्रकाश कुंभार, ग्रामसेविका जे.एम. दीक्षित यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले आहे. त्यांना सहकार्य लायन कन्स्टंट व जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने केलेली आहे.

गोल रिंगण सोहळ्याला माळशिरस पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांनी सदिच्छा भेट देऊन पालखी रिंगण सोहळ्याच्या मैदानाचा आढावा घेतलेला होता. यावेळी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी विठ्ठल कोळेकर, सरवदे साहेब सुळे साहेब आदी उपस्थित होते.

कैवल्य साम्राज्य ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील माळशिरस तालुक्यातील पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी पुरंदावडे ग्रामपंचायत सर्व सुख सुविधा व सोयीने सज्ज झालेली आहे. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून भाविकांना व वैष्णवांना अडचण होणार नाही, यासाठी माळशिरस पोलीस स्टेशन यांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणे काढलेली असल्याने व्यापारी व स्थानिक नागरिक यांनी घेतला मोकळा श्वास.
Next articleसदाशिवनगर ग्रामपंचायत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सज्ज…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here