बारामती येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यानाचे एकेरी नाव बदलण्याची राष्ट्रीय छावा संघटनेची मागणी…

बारामती (बारामती झटका)

बारामती येथील कसबा कारभारी चौकात नगर परिषदेने उभा केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाच्या कमानीला श्री छत्रपती शिवाजी उद्यान अशा एकेरी नावाच्या उल्लेखाची कमान उभी केली आहे. या विरोधात आज राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे-पाटिल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखीलदादा गोळे, बारामती लोकसभा प्रदेश अध्यक्ष नितीन कदम यांच्या अध्यक्षतेखाली बारामती नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी रोकडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

या उद्यानाचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे पुणे जिल्हा बारामती लोकसभा अध्यक्ष विक्रम रणवरे, मा. अध्यक्ष अतुल जाधव, महीला आघाडीच्या युवती अध्यक्षा शिवश्री. स्वप्नालीताई माने आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार घराघरापर्यंत पोचवा – पृथ्वीराज सावंत
Next articleसोलापूर डिव्हिजन रेल्वे हॉस्पिटलच्या मुख्य नर्सिंग अधिक्षक नसरीन आतार यांना नॅशनल वूमन्स एक्सेल्लंन्स अवॉर्ड जाहिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here