भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा माजी संचालक सुधीर काळे यांनी केला सन्मान

अक्कलकोट (बारामती झटका)

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कर्तव्यदक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अक्कलकोट येथील संपर्क कार्यालयात जाऊन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व नातेपुते नगरीचे युवा नेते सुधीर काळे यांनी सन्मान केलेला आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर अनेक स्तरातून कार्यकर्त्यांनी अभिनंदन केलेले आहे. भाजपमधील जुने विश्वासू सहकारी असणारे सचिन कल्याणशेट्टी यांचा सुधीर काळे यांनी अक्कलकोट येथील कार्यालयात जाऊन सन्मान केला. यावेळी सोलापूर व माळशिरस तालुक्यातील भाजपच्या सद्यस्थितीवर प्रदीर्घ अशी चर्चा करण्यात आली. लवकरच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची निकटवर्ती यांच्याकडून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा माळशिरस तालुक्यातील भाजपच्यावतीने सन्मान संपन्न.
Next articleमिलिंद सरतापे यांनी माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन पक्ष उभारणीसाठी कंबर कसली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here