भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीनिमित्त आ. राम सातपुते यांचा झंझावाती दौरा.

माळशिरस (बारामती झटका)

जगातील सर्वात मोठी आदर्श लिखित राज्यघटनेचे शिल्पकार, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व बँकेच्या स्थापनेत सिंहाचा वाटा उचलणारे, बहुजनांचा उद्धार कर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अहिंसा परमो धर्म जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर अशा दोन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विधानसभा मतदार संघात झंझावाती दौरा करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी अभिवादन करून भीमसैनिकांशी सुसंवाद साधला.


भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विविध ठिकाणी उपस्थित भीमसैनिकांना संबोधित करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका व संघटीत व्हा’ या बाबासाहेबांच्या संदेशाने बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचं, देशाचं सार्वभौमत्व अखंडित ठेवण्याचं काम त्यांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झालं. नागरिकांना एका मताचा समान अधिकार, सर्वांना स्वाभिमानानं जगण्याची, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार हे कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे.

डॉ. बाबासाहेबांचा मानव कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा विकास करणं हेच डॉ. बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. डॉ. बाबासाहेबांसारखे महामानव आपल्या देशात जन्मले आणि त्यांनी देशाला जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली, हे आपलं भाग्य आहे. डॉ. बाबासाहेब हे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. ते कायदेतज्ञ, घटनातज्ञ, अर्थतज्ञ होते. लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार सुद्धा होते. डॉ. बाबासाहेबांनी केलेला महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचं आंदोलन, शेतकरी हक्कांच्या चळवळीसारखे दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका, हे लढे देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचतील. त्यातून देशाची राज्यघटना, एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करू या, असे आवाहन लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी आपल्या भाषणांमधून केले.


महाराष्ट्र राज्य रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अशोकबापू पवार, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासमवेत रात्री उशिरापर्यंत बैठक संपन्न केल्यानंतर दि. 14 एप्रिल रोजी सकाळी मतदार संघातील कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या नातेपुते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीस उपस्थिती, माळशिरस, पुरंदावडे, खुडूस येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा अनेक ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला. उद्या सकाळी गोव्याचे मुख्यमंत्री ना. प्रमोदजी सावंत यांच्यासमवेत बैठक असल्याने लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते गोव्याकडे रवाना झाले.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाउलींच्या पालखीचे 21 जूनला प्रस्थान
Next articleकट्टर भीमसैनिक शिवाजीभाऊ यांनी भीमरायाच्या जन्म दिनादिवशी केला गृहप्रवेश व वास्तुशांती समारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here