मतदारांचा कानोसा, लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सौ. आशाताई ओवाळ यांनी सरपंच पदाची निवडणूक लढवण्याची मतदारांची अपेक्षा.

जनतेचा आशीर्वाद व मतदारांची इच्छा व अपेक्षा असल्यास निवडणूक लढविण्यास सज्ज – सौ. आशाताई नागनाथ ओवाळ

सदाशिवनगर ( बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. सदाशिवनगर गावातील मतदारांचा कानोसा घेतल्यानंतर लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सौ. आशाताई ओवाळ यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये गावाच्या विकासासाठी भरीव कार्य केलेले असल्याने लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच पदाची निवडणूक लढवावी अशी मतदारांची अपेक्षा आहे. लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सौ. आशाताई नागनाथ ओवाळ यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर सदाशिवनगरच्या मतदारांनी गेल्या वेळेस मतदान करून विश्वास दाखवला, त्या विश्वासाला पात्र राहून गावाची व सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. सरपंच थेट जनतेतील सर्व मतदारांनी निवडून दिल्याने मतदारांवर समाधानी आहे‌. मात्र, जनतेचा आशीर्वाद व मतदारांची इच्छा व अपेक्षा असल्यास निवडणूक लढविण्यास सज्ज आहे, असे मत सौ. आशाताई नागनाथ ओवाळ यांनी व्यक्त केलेले आहे.

सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडीच्या वेळी मतदारांनी मतदान करून गावच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी दिलेली आहे. मतदारांच्या मतदानाचा आदर करून पाच वर्षांमध्ये गावांमध्ये तीन ते चार कोटी रुपये विकास कामासाठी खर्च झालेले आहेत. अनेक दिवसांचा विस्तारित पाणीपुरवठ्याचा प्रलंबित प्रश्न मिटलेला आहे. पंधराव्या वित्त आयोगातून अनेक कामे केलेली आहेत. दलित वस्ती मधून रस्ते व इतर विकास कामे केलेली आहेत. शासनाच्या योजना सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी राबवीत असताना ग्रामपंचायतीची कागदपत्रे वेळेवर उपलब्ध करून दिलेली आहेत. मतदारांची पाच वर्षांमध्ये सेवा केलेली आहे.

मतदारांची जर अपेक्षा असेल तर पुन्हा जनतेच्या इच्छेसाठी निवडणुकीमध्ये उभा राहण्याकरता थेट जनतेतील सरपंच पदाची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे मत सौ. आशाताई नागनाथ ओवाळ यांनी व्यक्त केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर येथील शिबिरात ५० जणांची तपासणी तर, १३ जणांचे मोफत ऑपरेशन होणार.
Next articleFamily vacation sex fest, written by young women.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here