माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांची अतिक्रमणातील टपरी काढावी : दादा दडस.

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर वनविभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेल्या माजी आमदाराची टपरी हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांची वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे धाव.

माळशिरस ( बारामती झटका )

विधान परिषदेचे माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांनी पुणे-पंढरपूर रोडलगत वनविभागाच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करून टाकलेली टपरी त्वरित हटविण्यात यावी, यासाठी एकशिव गावचे सामाजिक कार्यकर्ते दादा जगू दडस यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस यांना निवेदन दिलेले असल्याने माळशिरस तालुक्यात वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या लोकांमध्ये खळबळ माजलेली आहे.

दादा जगू दडस यांनी वनपरिक्षेत्र माळशिरस यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि, आपल्या हद्दीमध्ये मौजे नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर, पुणे-पंढरपूर रोड लगत पूर्व बाजूस म्हणजेच श्रीराम दूध प्रक्रिया संघासमोर माजी आमदार ॲड. रामहरी गोविंद रुपनवर यांनी आपल्या म्हणजेच वनविभागाच्या हद्दीमध्ये एक बेकायदेशीर टपरी उभा केलेली आहे. तसेच तेथूनच त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या दूध संघाला व आयटीआय कॉलेजला बेकायदेशीरपणे व पर्यायी रोड असताना अतिक्रमण करून रस्ता काढलेला आहे. तरी अतिक्रमित टपरी त्वरित हटवावी व वनविभागाच्या हद्दीतून काढलेला बेकायदेशीर रोड वरून जाणाऱ्या वाहनांच्या रहदारीमुळे तेथे लावलेल्या झाडांवरती धुळ व माती बसून ती झाडे खराब होत चाललेली आहेत. त्यामुळे शासनाचे तसेच झाडांचे प्रचंड नुकसान होत आहे. आपला विभाग सामान्य माणसाला साधी येणे-जाणेसाठी पाऊलवाट देत नाही. तेथे धनदांडग्या तसेच लोकप्रतिनिधींना बेकायदेशीरपणे रहदारीचे रस्ते व टपऱ्या टाकण्यास मुभा देते हे अतिशय खेद युक्त आहे.

तरी आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, वर नमूद केल्याप्रमाणे ॲड. रामहरी गोविंद रुपनवर यांनी आपल्या म्हणजेच वनविभागाच्या हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे केलेल्या अतिक्रमण त्वरित काढावे. अन्यथा नाईलाजास्तव मला आपल्या कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करावे लागेल. असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दादा जगू दडस यांनी वनविभाग यांना दिलेले आहे. सदरच्या निवेदनावर वनविभाग काय भूमिका घेते, याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशेतकर्‍यांसोबत चर्चा करून भुमिका स्पष्ट करणार, तालुका आढावा बैठकीत स्वाभिमानीचा निर्णय…
Next articleविधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थयात्रेचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here