मळोली ( बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेशभैय्या टोपे यांचे मळोली गावचे उपसरपंच ॲड. महादेव पवार व सर्व सदस्य यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. आषाढीवारी निमित्त प्रत्येक वर्षी राजेशभैया टोपे हे वारीच्या वाटेवर चालण्यासाठी येतात. गुरुवारी 7 तारखेस ते ठाकुरबुवा येथील रिंगण पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी दिंडीतील वारकऱ्याशी संवाद साधला. वारीतील आनंद हा शब्दात वर्णन न करणारा असून तो स्वतः अनुभवला तरच त्याची प्रचिती येते, असे ते यावेळी म्हणाले.

मळोली येथे श्री संत गाडगेनाथ पालखी सोहळ्याचेही त्यांनी स्वागत केले. मळोली येथे त्यांचे स्नेही श्री. राजेंद्र जाधव पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी मळोली ग्रामस्थाशी संवाद साधला. यावेळी ॲड. महादेव पवार, गणेशराव पाटील, विजय पाटील, नानासाहेब जाधव, संतोष जाधव, जयसिंग पाटील, शिवराज जाधव, अथर्व जाधव, माळशिरस युवक काँगेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव जाधव पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाशबापू पाटील, अमोल पाटील, शब्बीर मुजावर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
