माढा (बारामती झटका)
दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नऊ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मानेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये नव्याने गठीत करण्यात आलेल्या पाणलोट विकास समितीच्या सचिवपदी राजेंद्र विश्वनाथ भोगे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन सचीव राजेंद्र भोगे यांनी यापूर्वी अन्नपूर्णा पतसंस्थेचे चेअरमनपद यशस्वीपणे सांभाळले होते. पाणलोट समितीचे सचिव म्हणूनही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते, शेततळी आणि इतर जलसंधारण व मृदा संधारणाची कामे करून शेतकरी व ग्रामस्थांचा चांगला फायदा करून दिला होता. या बाबींची दखल घेऊनच ग्रामसभेमध्ये सर्वानुमते त्यांची पुनश्च एकदा सचिवपदी बिनविरोध निवड करून त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मानेगावच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. ते मानेगावचे माजी सरपंच शिवाजी भोगे यांचे जेष्ठ बंधू आहेत.
यावेळी माजी उपसभापती उल्हास राऊत, उपसरपंच सिद्धेश्वर राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ पारडे, ग्रामसेवक सुभाष गळगुंडे, शिवाजी भोगे, महेबूब शेख, बाबासाहेब पारडे, अतुल देशमुख, धनाजी सुतार, मधूकर कदम, शीतल जोकर, नवनाथ राऊत, हरीश कारंडे, दीपक देशमुख, नेताजी लांडगे, अभिमान भोगे, दादा राऊत, मनोज पारडे, पांडुरंग माळी, हसीना शेख, शीला राऊत, रोहिणी भोगे, उमा लांडगे, सारिका लांडगे, वंदना बारबोले, सारीका भोगे, सुनिता काटकर, राणी बोडके, अनिता काटकर यांच्यासह ग्रामस्थ, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng