माळशिरसमध्ये मॅटर्नीटी अँड जनरल हॉस्पिटल डेंटल क्लिनिकचा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ.

सुप्रसिद्ध विधीतज्ञ ॲड. आर. एस. वाघमोडे यांचे चिरंजीव डॉ. विजय वाघमोडे व सुनबाई डॉ. अश्विनी वाघमोडे यांच्या राधामाई हॉस्पिटलचा विशेष मान्यवरांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात सुप्रसिद्ध विधीतज्ञ ॲड. आर. एस. वाघमोडे यांचे चिरंजीव डॉ. विजय वाघमोडे आणि सुनबाई डॉ‌. सौ. अश्विनी वाघमोडे यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राधामाई मॅटर्नीटी अँड जनरल हॉस्पिटल व डेंटल क्लिनिकचा शुभारंभ बुधवार दि. 5 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटे या शुभमुहूर्तावर माळशिरस शहरात पुणे-पंढरपूर रोड येथे होणार आहे.

डॉ. विजय वाघमोडे यांचे प्राथमिक शिक्षण सरस्वती विद्यालय, मुंबई येथे झाले असून त्यांनी बी.डी.एस. लातूर येथील एम.आय.डी.एस.आर. डेंटल कॉलेज येथे पूर्ण केले आहे. तर पुणे येथील डी वाय पाटील कॉलेजमधून एम.डी.एस. पूर्ण केले आहे. डॉ. विजय वाघमोडे हे गेली ५ वर्षांपासून माळशिरस येथील श्री डेंटल क्लिनिक मध्ये कार्यरत होते. डॉ. अश्विनी वाघमोडे यांचे प्राथमिक शिक्षण वर्धमान विद्यालय, वालचंदनगर येथे झाले असून बी.ए.एम.एस. सातारा येथील आर्या गर्ल मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केले आहे. तर एम एस (स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ) अश्विन रुरल मेडिकल कॉलेज मांचीहिल संगमनेर येथे पूर्ण केले आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ॲड. आर. एस. वाघमोडे, ॲड. सतीश आर. वाघमोडे, डॉ. विजय आर. वाघमोडे व डॉ. अश्विनी. व्ही. वाघमोडे यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोहम तळेकर याचा नीट व सीईटी परीक्षेतील यशाबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार
Next articleजिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी सक्तीच्या रजेवर जलजीवन टेंडरच्या चौकशीसाठी तीन सदस्य समिती स्थापन केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here