माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव निवृत्तीराव गायकवाड


माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विठ्ठल गायकवाड तर सचिवपदी आप्पा शेंडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा कांतीलाल सांस्कृतिक भवनात जिल्हाध्यक्ष बसवराज मणुरे यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर सभेत माळशिरस तालुका कार्यकारणीच्या निवडी मावळते अध्यक्ष प्रद्युम्न गांधी यांनी जाहीर केल्या. यावेळी खजिनदारपदी अश्पाक मुलाणी, उपाध्यक्षपदी योगेश गांधी व रणजित महाडिक पाटील, संघटक सहसचिव जगदिश राजमाने व सुधीर कैमकर, जनसंपर्क अधिकारीपदी सतीश चव्हाण यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

यावेळी बोलताना संघटनेचे नवीन अध्यक्ष श्री. विठ्ठल गायकवाड यांनी येत्या महिन्यात सर्व मेडिकल बांधवांसाठी त्यांच्या हक्काचे केमिस्ट भवन अकलूज याठिकाणी उभारणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व मेडिकल व्यावसायिक यांना मोफत एक्सपायरी पुस्तक देण्याचे जाहिर केले. तसेच सर्व वैद्यकीय व्यावसायिक बंधुसाठी क्रेडिट सोसायटी स्थापन करण्याचे जाहीर केले.

यावेळी सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री. बसवराज मनुरे यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गंगाधर कापसे, राजशेखर बारोळे, राजेश विरपे, प्रशांत खलिपे, राजेंद्रसिंह बोमरा, पांडुरंग वाघमोडे, राजन ठक्कर, व्यंकटेश पुजारी, सुरेश टेळे, सुरेश भगत, कल्याणराव देवडीकर, अनिल वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन सुहास उरवणे व राजाराम गुजर यांनी केले तर आभार आप्पा शेंडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास नितीन दोशी, शंकर पवार, अमोल आडगांवकर, विजय जगताप, प्रदिप गोरे, रवी जगताप, आनंद शिंदे, अमरसिंह गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनागनाथ तोडकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त आ. बबनराव शिंदे यांच्याहस्ते सन्मान
Next articleजय विजय सोप इंडस्ट्रीची प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या शिखराकडे दैदिप्यमान वाटचाल सुरू…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here