भांब गावचे लोकप्रिय सरपंच पोपट सरगर व ज्येष्ठ नेते विश्वास सिद माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विविध विकास कामांची निवेदन.
भांब ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील मांडकी इस्लामपूर, कण्हेर, जळगावी गोरडवाडी, रेडे, भांब या गावासह अनेक गावांच्या दळणवळणाचा अनेक दिवस रखडलेला म्हसवड नातेपुते मार्गावरील भांब इंचबावी घाट रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भांब गावाला सदिच्छा भेट दिली त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील गावांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी गाव भेट दौरा आयोजित केलेला होता. भांब गावचे लोकप्रिय सरपंच पोपटतात्या सरगर, व भांब गावचे ज्येष्ठ नेते विश्वास सिद यांनी खासदार निंबाळकर यांना गावामध्ये विकास कामांसाठी आपण भरघोस निधी द्यावा भांब इंचबावी घाट रस्त्याचे काम सुरु करावे वाड्या-वस्त्या वरती हायमास्ट आणि संपूर्ण गावामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला एलईडी लाईट बसवावी असे निवेदन खासदार यांना देण्यात आले निवेदनावर खासदार यांनी चर्चा करीत असताना घाट रस्त्यासह आपले सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वास रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला यावेळी भाजपचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्हा प्रभारी के के पाटील माजी अध्यक्ष बाळासाहेब वावरे, भांबचे सरपंच पोपट सरगर, ज्येष्ठ नेते विश्वास सिद, कण्हेरचे सरपंच पोपट माने, रेडे गावचे सरपंच आप्पा शेंडगे, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा नेते युवराज वाघमोडे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, डोंबळवाडीचे सरपंच पिनू माने, युवा उपाध्यक्ष दामोदर पालवे, हनुमंत कर्चे, गणेश शिद जाॅन्टी शिंदे आदींसह गावातील आजी माजी सदस्य प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng