माळशिरस तालुक्यात उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आणि आता निवडणूक आयोगातर्फे उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

वेळापूर दि. ६/१/२०२३ आणि निमगाव दि. २०/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी किरण मोरे सहा. गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस, चौंडेश्वरवाडी दि. ६/१/२०२३ व पिसेवाडी दि. ९/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी वैभव बर्वे मृद व जलसंधारण अधिकारी, उपविभाग अकलूज, जांभूड दि. ९/१/२०२३ व पानीव घुलेनगर दि. १०/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी एन. एच. चव्हाण, कृषी अधिकारी पंचायत समिती माळशिरस, संगम दि. ६/१/२०२३ व माळेवाडी (बो.) दि. ९/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी राहुल मिसाळ क अभियंता, माळशिरस पाटबंधारे उपविभाग माळशिरस, कोळेगाव दि. ६/१/२०२३ व फळवणी दि. ९/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी यु. डी. धायगुडे सहा. अभियंता श्रेणी १ सांगोला शाखा कालवा प्रकल्प उपविभाग क्र. ५ माळशिरस, उघडेवाडी दि. ६/१/२०२३ व धानोरे दि. ९/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी दिनेश राऊत कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण, उपविभाग क्र. ४ माचणुर माळशिरस, आनंदनगर दि. ९/१/२०२३ व बागेचीवाडी दि. १०/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी ए. डी. कडतारे कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.२ अकलूज, नेवरे दि. ९/१/२०२३ व यशवंतनगर दि. १०/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी डी. जी. ढोपरे कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. २ अकलूज, मारकडवाडी दि. ९/१/२०२३ व पळसमंडळ दि. १०/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी एस. एस. वाघ शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ अकलूज, चांदापुरी दि. ९/१/२०२३ व पठाणवस्ती दि. १०/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी जितमल पलाडिया क. अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ अकलूज, गुरसाळे दि. ९/१/२०२३ व तांबेवाडी दि. १०/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कार्यालय माळशिरस, मोठेवाडी (मा.) दि. ६/१/२०२३ व तरंगफळ दि. ९/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी सतीश जगताप मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय माळशिरस, सदाशिवनगर दि. ६/१/२०२३ व लोंढेमोहितेवाडी दि. ९/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी जी. एम. वसावे मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय माळशिरस, उंबरे दहिगाव दि. ६/१/२०२३ व मेडद दि. ९/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी दत्तात्रय गायकवाड मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय माळशिरस, पुरंदावडे दि. ६/१/२०२३ व तामसिदवाडी दि. ९/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी सागर टकले मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय माळशिरस, खंडाळी दत्तनगर दि. ९/१/२०२३ व इस्लामपूर दि. १०/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी धैर्यशील इनामदार स्था. अभियंता, सांगोला शाखा कालवा प्रकल्प उपविभाग क्र. ५ माळशिरस, तिरवंडी दि. ९/१/२०२३ व कचरेवाडी दि. १०/१/२०२३ या ग्रामपंचायतीसाठी नितीन गाढवे मुख्याधिकारी, माळशिरस नगरपंचायत माळशिरस, काळमवाडी दि. ६/१/२०२३ ग्रामपंचायतीसाठी सुजित काळे कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्र. ४ माचणुर माळशिरस आदी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत.

तसेच माधव खांडेकर मुख्य अधिकारी नगरपंचायत नातेपुते, कौस्तुभ गव्हाणे मुख्याधिकारी महाळुंग श्रीपुर नगरपंचायत, अमोल मस्कर सहा. अभियंता श्रेणी १ माळशिरस पाटबंधारे उपविभाग माळशिरस, तुषार देशमुख निवासी नायब तहसीलदार माळशिरस, आशिष सानप महसूल नायब तहसीलदार माळशिरस यांची राखीव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सदरची निवडणूक प्रक्रिया तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleइतर राज्यांमध्ये सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्राचा वापर – आ. रोहित पवार
Next articleनागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आघाडीवर तर पेट्रोलियम स्पोर्ट बोर्डची ग्रँडमास्टर मेरी गोम्स द्वितीय स्थानावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here