माळशिरस येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते आणि मुख्य महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर यांच्या उपस्थीतीत संपन्न.

सर्व निवडणूका स्वबळावर लढवणार – माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर

माळशिरस (बारामती झटका)

ता. माळशिरस येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक माजी कॅबिनेट मंत्री तसेच संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच मुख्य महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर यांच्या उपस्थीतीत पार पडली.

यावेळी आमदार महादेव जानकर यांनी बोलताना सांगितले कि, यापुढील सर्व निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, नगरपालिका, रासप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जानकर साहेबांनी पदाधिकार्यांना संबोधित केले. तालुक्यातील प्रत्येक गावागावात जावुन कार्यकता जोडला पाहीजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती गण, गट वाईज भेटी देवुन सभासद वाढवले पाहीजे, राष्ट्रीय समाज पक्षाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला आहे. आपण तीथपर्यंत पोचले पाहिजे. गाव तीथं शाखा तसेच विविध प्रकारच्या आघाड्या स्थापन करा, असे आवाहन करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडॉ. ऋतुजा शामराव वाघमोडे यांच्या यशाचे माळशिरस तालुक्यातील जनतेतून कौतुक
Next articleरत्नत्रय पतसंस्थेच्या चेअरमन पदी विरकुमार दोशी व व्हा. चेअरमनपदी डॉ. निवास गांधी यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here