माळशिरस शहरात घर घर तिरंगा, दुकान दुकान तिरंगा अभियानाला उदंड प्रतिसाद.

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आझादी का अमृत महोत्सव उपक्रमास उदंड प्रतिसाद

माळशिरस ( बारामती झटका )

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आझादी का अमृत महोत्सव निमित्त ‘घर घर तिरंगा दुकान दुकान तिरंगा’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. आज या संकल्पनेला ग्रामीण भागातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

माळशिरस नगरपंचायत हद्दीत विष्णुपंत कुलकर्णी व्यापारी संकुल माळशिरस ५८ या ठिकाणी श्री हेअर आर्ट या दुकानांमध्ये समोरच्या काचेवर देशाचा तिरंगा लावून देशभक्ती व पंतप्रधान यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे.

श्री हेअर आर्टचे मालक रमेश राऊत, पृथ्वीराज राऊत व हसन मुलाणी यांच्यासह कलासागर ग्राफिक्सचे मालक कल्पक देवकर यांनी आपल्या दुकानांमध्ये तिरंगा ध्वज व घर घर तिरंगा दुकान दुकान तिरंगा असे फलक लावलेले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकर्नाटक राज्यात आझादी का अमृत महोत्सवानिमित्त आ. राम सातपुते यांनी युवकांचा जोश व उत्साह वाढविला.
Next articleहर घर तिरंगा घर घर तिरंगा शेतकऱ्यांची एफआरपी मिळालीच पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here