मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला ? का खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान केले ?, स्पष्ट करावे.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शिफारशीवरून रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी मिळाली.

म्हैस काय मालकासाठी …. करीत नाही, तिला सुद्धा ….. असते, अशी समाजात म्हण प्रचलित आहे.

माळशिरस ( बारामती झटका )

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांच्या मैत्रीपूर्ण लढतीत माळशिरस तालुक्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखापेक्षा जास्त लीड मिळालेले होते त्यामध्ये शिवरत्नवरील मोहिते पाटील परिवार, प्रतापगडावरील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील परिवार व तालुक्यातील विरोधी गटातील परिवार या सर्वांनी मिळून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करून मताधिक्य दिलेले होते. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मताधिक्यामध्ये तालुक्यातील भाजपचे बुद्रुक नेते व कार्यकर्ते यांच्यासह डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी व तालुक्यातील विरोधी नेते व कार्यकर्ते यांनी निवडणुकीनंतर कधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य दिले, असा कधीही गवगवा केलेला नाही. मात्र, मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक नेहमी एक लाखापेक्षा लीड दिलेला उल्लेख करीत असतात‌. त्यामुळे राजकीय विश्लेषकामध्ये प्रश्न उपस्थित होतोय मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला ? का रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान केले ?, हे स्पष्ट करावे. कारण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षश्रेष्ठीला दाखवण्याकरता केलेले मतदान आहे. त्यामुळे समाजात एक म्हण प्रचलित आहे म्हैस काय मालकासाठी ….. करीत नाही, तिला सुद्धा….. असते, अशी बुद्रुक भाजपमध्ये चर्चा सुरू आहे.

माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्षश्रेष्ठी व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर तालुक्यातील मूळ भाजपचा विरोध असताना सुद्धा शिफारस केलेली आहे. त्यामुळे खासदार मोहिते पाटील यांच्या एकट्याच्या मतावर मताधिक्य न मिळता इतरांच्याही सहकार्याने मिळालेले असतानासुद्धा रणजीतसिंह मोहिते पाटील यांची शिफारस खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली आहे.

मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये नव्याने प्रवेश केलेला होता भाजपला स्वतःची ताकद दाखवण्याकरता आणि विरोधी उमेदवार संजयमामा शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील यांचे राजकारण संपुष्टात आणले होते, याचीही मनामध्ये चिड होती. त्यामुळे मोहिते पाटील समर्थक यांनी भाजपचे कमळ हातामध्ये घेऊन भाजपच्या उमेदवाराला मतदान दिलेले आहे. भारतीय जनता पक्षाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याऐवजी दुसरा उमेदवार दिला असता तरीसुद्धा मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यातून भाजपलाच मतदान करावे लागले असते. त्यामुळे मोहिते पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचे काम केलेले आहे, याचा विसर पडू देऊ नये. विधानसभेच्या वेळी आमदार राम सातपुते यांना मोहिते पाटील यांनी संपूर्ण ताकद लावूनसुद्धा मोहिते पाटील यांची ताकद कमी पडलेली होती.

भाजप बुद्रुक व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेते व कार्यकर्त्यांची मदत मिळाल्याने माढा लोकसभा मतदारसंघ व माळशिरस विधानसभा मतदार संघात कमळ फुललेले आहे‌. त्यामुळेच मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर संधी मिळालेली आहे. मिळालेल्या संधीचे भाजप पक्ष वाढीसाठी काम करावे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षामध्ये ध्येयधोरणापेक्षा व्यक्तीला किंमत असते. मात्र, भाजपमध्ये व्यक्तीपेक्षा ध्येयधोरणाला व लोकप्रतिनिधी बरोबरच प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांना किंमत असते‌. त्यामुळे स्वतःहून पायावर धोंडा मारून घेऊ नये, असे मोहिते पाटील समर्थकांमधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articlePlank Software Assessment
Next articleलावणी नृत्यांगना सरलाताई नांदोरेकर यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक लावणी कलावंत पुरस्कार जाहिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here