राजेंद्र काशिनाथ चिखले ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा (बारामती झटका)

महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संचलित सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ सोलापूर यांचेकडून राजेंद्र काशिनाथ चिखले यांना गुणवंत गणित शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, पर्यवेक्षक भांजे साहेब, डॉ. ह. न. जगताप, आदलिंगे सर, सिकंदर नदाफ, सूर्यकांत चोरमले, संजय भस्मे, शिवशरण बिराजदार, किरण परदेशी, भाऊसाहेब आजबे आदी उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री गिरधरदास देवी विद्यालय करमाळाचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, सचिव अमोलशेठ संचेती, सौ. सुनीता देवी, चंद्रकांत देवी, विजयकुमार दोशी, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संभाजी जगताप, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुरस्कार मिळाल्यानंतर राजेंद्र चिखले म्हणाल की, माझा लहानपणापासूनच गणित विषय आवडीचा होता. मी अत्यंत चांगल्या पद्धतीने गणित शिकवत असल्यामुळे माझ्या वर्गातील आत्तापर्यंत एकही विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत गणितात नापास झाला नाही किंवा प्रत्येक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले हेच माझे यश आहे.

गणित विषय अवघड आहे अशी समजूत विद्यार्थ्यांची असते, त्यामुळे विद्यार्थी या विषयात अभ्यास करण्यात दुर्लक्ष करतो. उलटपक्षी लक्ष देऊन गणिते सोडवली तर गणितासारखा सोपा विषय कोणता नाही, असे चिखले सर यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते नगरीत प्रथमच गौतमी पाटील संदीप दादाच्या वाढदिवसाला नृत्यांचा अविष्कार करणार….
Next articleशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस संग्रामनगर ग्रामपंचायतींच्या वतीने सामाजिक उपक्रमाने साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here