राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचे वडील शिवदास शंकर जानकर अनंतात विलीन

उत्तमराव जानकर यांच्या राजकारणाच्या जडणघडणीत वडिलांचे मोलाचे सहकार्य.

वेळापूर ( बारामती झटका )

वेळापूर ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार व प्रतिष्ठित लाकूड व्यापारी शिवदास शंकर जानकर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी बुधवार दि. 20/10/2021 पहाटे अल्पशा आजाराच्या उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्यावर वेळापूर येथील वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार चिरंजीव उत्तमराव व दत्तात्रय यांनी मुखाग्नी दिला. स्व. शिवदास जानकर हजारोंच्या उपस्थितीत अनंतामध्ये विलीन झाले आहेत. यावेळी माजी आमदार रामहरी रुपनवर, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र ठवरे पाटील, माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, मराठवाड्याचे धनगर समाजाचे नेते शिवदास बिडगर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस के. के. पाटील, लोणंद-फलटण रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने, रणजीतसिंह जाधव, माऊली पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम देशमुख, बाळासाहेब लवटे, मधुकर पाटील, अनिल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, भाजपचे तालुका उपाध्यक्ष, वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे, रमेशभाऊ पाटील, शंकरराव उर्फ केपी काळे पाटील, मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, बाजीराव माने पाटील, आरिफखान पठाण, भजनदास चोरमले, सुरेश पिसे, उंबरे दहिगावचे सरपंच विष्णुपंत नारनवर, मेडदचे सरपंच युवराज झंजे, भांबचे सरपंच पोपटराव सरगर, फोंडशिरसचे पोपटराव बोराटे, मांडवेचे सरपंच हनुमंत टेळे, पिलीवचे माजी सरपंच संग्राम पाटील, उद्योजक संतोषआबा वाघमोडे पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीपदादा ठोंबरे, डॉ. ए. पी. वाघमोडे, खुडूसचे माजी सरपंच रामचंद्र चौगुले, वस्ताद ज्ञानदेव लोखंडे, यशवंतनगर कारखान्याचे संचालक रामचंद्र ठवरे, केशव ठवरे आदी मान्यवरांसह तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळी दहा वाजता वेळापूर येथील गरुड बंगला येथून अंत्ययात्रा पालखी चौक वेळापूर एसटी स्टँड मार्गे वैकुंठ स्मशान भूमीत दाखल झाली. सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी मुखाग्नी देण्यात आला. अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, पंचायत समिती सदस्य अजय सकट, खुडूसचे माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे, सौरभ बागनवर, निवृत्ती भुसारे, नजीर शेख, दडस दादा, उपसरपंच जावेद मुलाणी, हनुमंत वायदंडे, जब्बार मुलाणी, जवान माने देशमुख, संजय देशपांडे आदींनी परिश्रम घेतले. शुक्रवार दि. 22/10/2021 रोजी सकाळी सात वाजता रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम होणार आहे.
शिवदास जानकर यांचे मूळ गाव धानोरे आहे. ते व्यवसायानिमित्त वेळापूर येथे आलेले होते. त्यांचा स्वाॅ मिल लाकडाचा व्यवसाय होता. त्यांनी अनेक वर्ष श्री गोंदवलेकर महाराज देवस्थान यांना अन्न शिजवण्यासाठी लाकडांचा पुरवठा केलेला आहे. उत्तमराव जानकर यांच्या राजकारणाच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचे मोलाचे सहकार्य होते. उत्तमराव जानकर यांनी कोणतेही निर्णय घेतला तरी त्यांचे वडील त्या निर्णयाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत होते. प्रतिकूल परिस्थितीत उत्तमराव जानकर वडिलांच्या सहकार्याने राजकारणामध्ये उभे राहिले आहेत. स्व. शिवदास जानकर यांच्या मृत्यूने धानोरे व वेळापूर गावावर शोककळा पसरलेली होती. गावातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleखुडूस येथे वनविभागाच्या जागेत विनापरवाना वास्तव्य करणाऱ्यांना वनविभागाचेच अभय
Next articleमाजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते श्री शंकर साखर कारखान्याचा डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here