लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबारामुळे सर्वसामान्य जनतेच्या घरादारात आनंदाचे वातावरण.

प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्येचा शिळेतून उद्धार झाला तर रामाच्या जनता दरबारातून वाघमोडे यांच्या पुनमचा बेड वरून उठण्याचा आधार

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी, विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच्या अडचणी, शेतकरी बांधवांच्या अडचणी यासाठी जनता दरबाराचे दर आठ दिवसाला नियोजन केले जाते.

जनता दरबारामध्ये अनेक लोकांचे सार्वजनिक व व्यक्तिगत प्रश्न मार्गी लागलेले आहेत. पैशाअभावी हात, पाय, गुडघे, ह्रदय, मनके, अपंगत्व अशा अनेक व्याधींनी त्रस्त असणाऱ्या गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जात असल्यामुळे माणसातील देव माणूस म्हणून आमदार राम यांची ओळख झालेली आहे.

रामायणामध्ये प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या नामक शापित असणाऱ्या स्त्रीचा पदस्पर्शाने शिळेतून उद्धार झालेला आहे, तसाच रामाच्या जनता दरबारातून गिरवी गावचे बाळू वाघमोडे यांच्या कन्येचा बेडवरून उठण्याचा आधार आमदार राम यांचा झालेला आहे. त्यामुळे पहिलेच लोकप्रिय व दमदार आमदार राम सातपुते यांची ओळख असणारे जनता दरबारामुळे सर्वसामान्य जनतेच्या कार्यातून घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण केलेले आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार राम सातपुते यांनी अनेक विश्वासू कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत. मतदार संघातील लोकांच्या अडीअडचणी आमदार राम सातपुते यांनी पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्राच्या बाहेर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यामुळे बाहेरच्या राज्यात जरी असतील तरीसुद्धा फोनवरून संपर्क सुरू असतो. जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी ते कायम कटिबद्ध असतात.

असेच विश्वासू कार्यकर्ते ॲड. नंदकुमार लवटे पाटील यांनी आ. राम सातपुते आणि गिरवी गावचे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील बापू अर्जून वाघमोडे यांची जनता दरबारामध्ये भेट घालून दिली. बापू वाघमोडे यांना उदरनिर्वाहापूर्ती जमीन आहे. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. यापैकी पुनम हिला दोन वर्षापासून पायाच्या खुब्यातील बॉलचा प्रॉब्लेम होता.

ऑपरेशन केल्याशिवाय गत्यंतर नव्हते परंतु, ऑपरेशनचा खर्च करण्याची ऐपत नव्हती. पुनम बेडवर झोपून होती, चालता येत नव्हते. तिला उचलून न्यावे आणावे लागत होते, अशी बिकट परिस्थिती होती. दोन्ही पायाचे खुब्यातील बॉल निकामी झालेले होते. ऑपरेशनसाठी आठ लाख रुपये खर्च येणार होता. सर्व परिस्थिती आमदार राम सातपुते यांनी जाणून घेतली. क्षणाचाही विचार न करता पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे पुनमला ॲडमिट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पुनमवर दि. 9 जून रोजी पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया दि. 27 जुलै रोजी करण्यात आली.

दोन्हीही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पूनमला भेटण्याकरता राजकीय धावपळ असतानासुद्धा आमदार राम सातपुते यांनी पुनमची व तिच्या आई-वडिलांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. पुनम आणि तिचे आई-वडील यांच्या चेहऱ्यावरील आदरयुक्त भाव सर्व काही सांगून जात होता.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी कित्येक लोकांच्या घरातील आर्थिक अडचणीमुळे खोळंबलेल्या शस्त्रक्रिया करून गोरगरीब जनतेचा देव माणूस म्हणून त्यांची जनता दरबारातून वेगळी ओळख निर्माण होत आहे.

अनेक रावण प्रवृत्तीच्या लोकांना जनता दरबाराचे महत्त्व कळलेले नाही. ज्यांच्या जीवनामध्ये जनता दरबाराचा आनंद मिळालेला आहे, असे लोक गाढवांना गुळाची चव काय, असे म्हणून आपले कार्य असेच पुढे चालू ठेवावे, असा आशीर्वाद लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना सर्वसामान्य जनतेतून मिळत आहे.

माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनता आमदार राम सातपुते यांच्या कार्यावर समाधानी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या यांच्या लेकी अस्तित्वाच्या लढाईसाठी रणरागिनी काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आल्या.
Next articleदोन मुलं आणि दोन मुली असूनही आईचा सांभाळ कोणी करेना…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here