हा अर्थसंकल्प नसून भारतीय जनता पक्षाचा निवडणूक संकल्प आहे – रविकांत वरपे, प्रदेशप्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, तथा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नसून भाजपचा 2024 चा निवडणूक संकल्प आहे. 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा, गाजराचा पडलेला पाऊस महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन महविकास आघाडीचे सरकार पाडले आणि गद्दाराच्या शिक्का त्यांच्या माथ्यावर लागलेला आहे तो पुसण्यासाठी भरघोस घोषणांचा पाऊस पाडला आहे.
मा.अजितदादा ज्यावेळी अर्थमंत्री होते तेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा दर 9.1टक्के होता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत हा विकास दर 6.8टक्के आहे जवळपास 2.3 टक्क्यांनी महाराष्ट्राचा विकास दर घटला आहे. एकीकडे विकास दर घटत असताना महाराष्ट्राचे महसुली उत्पन्नातील तूट जवळपास 16 हजार 122 कोटींवर आली आहे. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ढिसाळ नियोजन, लोकप्रिय घोषणा अभाव यामुळे महाराष्ट्राच्या महसुली उत्पन्नातील तूट वाढताना दिसत आहे. या अर्थ संकल्पात केलेल्या लोकप्रिय घोषणा कोणत्या माध्यमातून पूर्ण करून कुठे निधिंची तरतूद करतील हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
‘आमदनी अठणी, खर्चा रुपया’ या पद्धतीचा अर्थसंकल्प फडणवीस यांनी मांडला. नरेंद्र मोदी यांना देशाची इकॉनोमी 5 ट्रिलियन डॉलर करायची आहे आणि महाराष्ट्राची इकॉनॉमिक्स एक ट्रिलियन डॉलर 2030 पर्यंत करायची आहे. आज महाराष्ट्राचा विकासाचा दर हा 6.8% आहे. आपल्याला 2030 पर्यंत महाराष्ट्राची इकॉनोमी एक ट्रिलियन डॉलर करायचे असेल तर आपल्या राज्याचा जो जीडीपी आहे तो 12.1% असावा लागतो म्हणजे तो आताचे विकासदरापेक्षा दुप्पट करावा लागेल. त्यासाठी ज्या इकॉनोमिक पॉलिसी आवश्यक आहेत त्याचा कुठेही उल्लेख या अर्थसंकल्पात झालेला दिसत नाही.
मा. अजितदादांनी जी विकासाची पंचसूत्री मांडली होती, आता त्याच पंचसूत्रीचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत म्हणून पुढे आणले आहे. पंचामृत ज्या पद्धतीने चमच्याने हातात देतात त्याच पद्धतीने या अर्थसंकल्पात घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात ना युवकांच्या रोजगारासंबंधी काही योजना केल्या, ना शेतकऱ्यांसाठी योजना, ना महिलांची धोरणे आखली. या पंचामृताने ‘भूकही भागत नाही आणि पोटही भरत नाही’ अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आज मांडला.
जो मोदींचा अमृतकाल होता तसा हा देवेंद्र फडणवीस यांचा पंचामृत काल आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी यातून भरपूर सुकाळ मिळणार आहे, पण महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या पदरी फक्त दुष्काळ या सरकारने टाकलेला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प नसून भारतीय जनता पक्षाचा निवडणूक संकल्प आहे. – रविकांत वरपे, प्रदेशप्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, तथा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng