शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावान कार्यकर्त्याला नेत्यांकडून कायम पाठबळ मिळत असते.

दिवाळीचे फटाके फुटत असताना राजकीय फटाके फुटले, पालकमंत्री आणि खासदार यांची बंद दाराआड चर्चा

फलटण ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमधील उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आवर्जून लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या राजभवन निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन नाईक निंबाळकर परिवार यांना दिपवाळीच्या शुभेच्छा देऊन मानसन्मान स्वीकारून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची बंद दाराआड चर्चा झालेली आहे. दिवाळीचे फटाके फुटत असताना राजकीय फटाके फुटले असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील दीपावली सणानिमित्त कोल्हापूर येथे घरी गेलेले होते. पुणे-मुंबईकडे जात असताना आवर्जून वाट वाकडी करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिलेली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावान कार्यकर्त्याला नेत्यांकडून कायम पाठबळ मिळत असते. याचा प्रत्यय चंद्रकांतदादांच्या आवर्जून येण्याने पाहावयास मिळत आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा यांचा सन्मान खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. यावेळी जेष्ठ नेत्या श्रीमती मंदाकिनी नाईक निंबाळकर उर्फ काकी, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वराज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर उर्फ अभिदादा, खासदार यांचे विश्वासू सहकारी राजेश शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, फलटण नगर परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवक, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकाससेवा संस्था, दूध संस्था, मजूर संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सन्मान व पाहुणचार स्वीकारल्यानंतर बंद दाऱाआड खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांशी सुसंवाद व हितगुज साधून पुणे जिल्ह्याकडे रवाना झालेले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रगतशील बागायतदार नंदकुमार माने पाटील यांच्या माणुसकीवर ऊसतोड मजूर भारावून गेले.
Next articleराहूल काळे नातेपुते यांचा ऑक्टोबरमध्ये द्राक्ष उत्पादनाचा अभिनव यशस्वी प्रयोग – श्री. सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here