शिक्षण समाजाच्या प्रगतीचे माध्यम – प्रतिमा शहा #मांडवे #रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे

मांडवे (बारामती झटका)

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शनिवार दि. २५ मार्च रोजी ऊर्जा २०२३ या नावाने वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा प्रशालेच्या संकुलात उत्साहात संपन्न झाला. ऊर्जा म्हणजे शक्ती, उदारपणा या प्रतिभा संपन्न आणि सृजनशीलतेचा एक अविष्कार मोठ्या उत्साहात व आत्मियतेने साजरा करण्यात आला. यावेळी वार्षिक बक्षीस वितरण सौ. प्रतिमा उदंक शहा (ज्येष्ठ समाजसेविका, पुणे) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे उदघाटन श्री. व सौ. शुक्ला संतोष दोशी (जेष्ठ समाजसेवक, अकलूज) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी जितेश सुभाष शहा (संचालक मरवडेकर मॉल, पंढरपूर) हे होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रमोद दोशी यांनी केले. त्यांनी संस्थेच्या स्थापने पासूनच्या प्रगतीचा आलेख मांडला. सदर प्रसंगी बोलताना मिहिर गांधी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन गरजेचं असते.” रोहित जैन यांनी शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व विध्यार्थ्यांना सांगितले.

सौ. शुक्ला संतोष दोशी यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांचे कौतुक केले. प्रतिमा उंदक शहा यांनी शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. शिक्षणाने फक्त एकाच व्यक्तीची प्रगती होत नसते तर त्या माध्यमातून समाजाची प्रगती होत असते, असे त्यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले त्यांचे कौतुक केले व जीवनात नम्रता आणावी असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेश सुभाष शहा यांनी रत्नत्रय ही माणसातला माणूस घडवणारे संस्काराचे माहेरघर असल्याचे सांगून पुढील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमामध्ये एकूण २५ गीतांचा सामावेश होता. त्यामध्ये नामोकार मंत्र, गणेश वंदना, भक्ती गीत, शेतकरी गीत, कोळी गीत, पोवाडा, लावणी, थीम, रिमिक्स आदीचा समावेश होता. राज्यस्तरीय, विभागस्तर, जिल्ह्यास्तर, तालुक्यास्तरावरील विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धामधील ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सदर प्रसंगी अनंतलाल रतनचंद दोशी, संतोष दोशी, जितेश सुभाष शहा, प्रीतम महावीर गांधी, रोहित राजेश जैन, उज्वल सुरेश जैन, डॉ. सतीश दोशी, मिहिर गांधी, अभयकुमार दोशी, सागर अजितकुमार फडे, महावीर शहा, वैभव शहा, विशाल गांधी, निवास गांधी, अमित गांधी, रोनक चंकेश्वरा, निश्चल व्होरा, अमित दोशी, रामदास कर्णे, अभिजीत दोशी, प्रतिक दोशी, सनतकुमार दोशी, बाहुबली दोशी, संजय गांधी, प्रशांत दोशी, सुरेश धाईंजे, बबन गोफणे, देविदास ढोपे, अर्जुन धाईंजे, दादा वाघमोडे, विठ्ठल अर्जून, सचिन पवार, मृणालिनी दोशी, विनयश्री दोशी, भाग्यश्री दोशी, पूनम दोशी, पार्वती जाधव, धनश्री दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे वार्षिक अहवाल वाचन अमित पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैवत वाघमोडे सर व वनिता पिसाळ मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन विरकुमार दोशी यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतहसील कार्यालय, आरटीओ, वन विभागाच्या सौजन्याने अवैध मुरूम वाहतूक राजरोसपणे सुरू आहे… #तहसील कार्यालय #अवैध मुरूम वाहतूक #माळशिरस उपविभागीय परिवहन कार्यालय #वनपरिक्षेत्र कार्यालय माळशिरस
Next articleवेळापूर येथील शिवकन्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश चालू #शिवकन्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट #वेळापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here