मोहिते पाटील यांनी राजकीय ताकद दाखवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून स्तुती वदवली.
कोल्हापूर ( बारामती झटका )
भागवत धर्माचा ज्यांनी पाया रचला असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना समाजामधील अति विद्वान लोकांनी त्रास दिलेला होता. अशा कठीण परिस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अध्यात्माची ताकद दाखवण्यासाठी रेड्यामुखी वेद वदवीला होता. तसाच प्रकार माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांनी राजकीय ताकद दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून स्तुती वदवली असल्याने राजकीय वर्तुळात खुमासदार जोरदार चर्चा सुरू आहे.
कोल्हापूर येथील आयोध्या हॉटेलमध्ये माळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस, महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीमधील भाजप आणि भाजप पुरस्कृत स्थानिक आघाड्यामधील विजयी नगरसेवकांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना मोहिते पाटील यांच्या चाणक्यनितीने नगरसेवक निवडून आलेले आहेत. मोहिते-पाटील यांनी स्थानिक राजकारणाचा विचार करून आघाडी करण्याचा निर्णय मोहिते-पाटील यांचा योग्य ठरला, असे म्हणत नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सन्मान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
माळशिरस नगरपंचायतीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली. नातेपुते येथे भाजपच्या नेत्यांनी स्थानिक आघाडी करून निवडणूक लढविली मात्र, महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधामध्ये स्थानिक आघाडी मोहिते पाटील यांनी उभी करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पराभूत केलेले आहेत. भारतीय जनता पार्टीची नाचक्की महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या निवडणुकीत झालेली आहे. भाजपच्या उमेदवारांचा पराभव करणाऱ्या स्थानिक आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सन्मान तोही भाजपच्या प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून केला जात आहे शिवाय ज्यांनी स्थानिक आघाडी करून भाजपचा पराभव केला त्यांचे गुणगान गायले आहे.
भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी काम केलेले आहे. तळागाळात भाजप व संघाचे कार्य पोहोचवण्याचे काम केलेले आहे. संघाची व भाजपची ध्येयधोरणे चंद्रकांत पाटील यांना माहित असताना पक्षविरोधी काम करणाऱ्या लोकांची स्तुती करणे त्यांना अशोभनीय आहे. भाजप पक्षाला गालबोट लावलेले आहे. देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते यांना चंद्रकांत पाटील यांची मोहिते-पाटील यांच्यावर केलेली स्तुतीसुमने व भाजप पक्षाच्या विरोधात निवडून आलेल्या सदस्यांचा सन्मान करणे कितपत योग्य वाटणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेते मंडळी चंद्रकांत पाटील यांच्या पक्षविरोधी भूमिकेकडे कसे पाहतील, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माळशिरस तालुक्यात येऊन सन्मान केला असता तर मोहिते पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे म्हणता आले असते. मात्र, कोल्हापूरला जाऊन सत्कार सोहळा आयोजित केलेला असल्याने स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी हा खटाटोप केलेला असल्याचा संशय स्वकियांमधून येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng