सदाशिवनगर येथील महालक्ष्मी नवरात्र उत्सवातील महिलांना बाबासाहेब माने पाटील परिवाराकडून साड्यांचे वाटप करण्यात आले.

नवरात्र उत्सवातील कार्यकर्ते व उपस्थित माता भगिनी यांनी स्तुत्य उपक्रमाचे केले कौतुक.

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर (लांडगिरमाळ) येथील महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाच्या शारदीय नवरात्र उत्सवात सौ. रेश्माताई बाबासाहेब माने-पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने-पाटील यांच्या हस्ते मंडळातील कार्यकर्त्यांना व तरुणांना शंभर टी-शर्ट व महिला भाविक भक्त यांना १०० साड्याचे वाटप करण्यात आले होते.

यावेळी सदाशिवनगर पंचक्रोशीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच दादासाहेब पालवे, रमेश सुतार, पप्पू सालगुडे, मदन सुळे, अमोल धाईंजे, आप्पा शिंदे, किरण सावंत, नितीन सालगुडे पाटील, संजय धाईंजे, अशोक शिंदे, प्रवीण शिंदे, प्रवीण बागनवर, जितेंद्र गुरव, कालिदास रुपनवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महालक्ष्मी नवरात्र उत्सव तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी व उपस्थित महिला भगिनींनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस पंचायत समितीच्या आवारात दसऱ्याच्या मुहूर्तावर दिव्यांग कक्षाची स्थापना
Next articleमांडवे सदाशिवनगर येथील मुक्ताई क्लाॅथ सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त खरेदीवर 20% डिस्काउंट, ग्राहकांचा उदंड प्रतिसाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here