सदाशिवनगर (बारामती झटका)
आषाढी वारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा सदाशिवनगर येथील रत्नत्रय परिवाराने जोपासली आहे. वारकऱ्यांना घरगुती जेवणाचा आस्वाद मिळावा या हेतूने गेली दहा वर्षापासून रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर, रत्नत्रय ग्रामीण बिगर पतसंस्था सदाशिवनगर व रत्नत्रय परिवार सदाशिवनगर यांचा श्री. अनंतलाल दादा दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे.


यंदाचे अन्नदानाचे हे अकरावे वर्ष आहे. मंगळवार दि. ५ जुलै रोजी सकाळी १० वा. अन्नदान सुरू केले. यामध्ये बेसन, भाकरी, मिरचीचा ठेचा, पोहे, फरसाणा, भडंग, भेळ आदींचा समावेश होता. सदर प्रसंगी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री.अनंतलाल दादा दोशी, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन वीरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद दोशी, पतसंस्था सचिव ज्ञानेश राऊत, रत्नत्रय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दैवत वाघमोडे सर, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य अमित पाटील सर, विक्रम पालवे, आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अन्नदानातून मिळणारे समाधान मन तृप्त करत असल्याची भावना यावेळी संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांनी व्यक्त केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
