मोहिते पाटील समर्थक यांनी साथ दिल्यास चार ते साडेचार लाख टन उसाचे गाळप होऊ शकते.

सदाशिवनगर ( बारामती झटका )
श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर या साखर कारखान्याच्या 2021-2022 गळीत हंगामाच्या प्रत्यक्ष ऊस गाळपास सुरुवात झालेली आहे. मोहिते पाटील समर्थक यांनी ऊस गाळपासाठी साथ दिल्यास यंदाच्या वर्षी चार ते साडेचार लाख टन उसाचे गाळप होऊ शकते अशी चर्चा आहे.श्री शंकर सहकारी साखर कारखाना गेली पाच ते सहा वर्ष बंद अवस्थेत होता. सदरचा कारखाना विधान परिषदेचे आमदार कारखान्याचे विद्यमान चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गेल्या वर्षी 12 दिवस कारखाना सुरू केलेला होता. यंदाच्या वर्षी कारखान्याचे बॉयलर पूजन, मोळी पूजन, कारखाना प्रशासनाने मोठ्या थाटामाटात केले होते. सदरचा कारखाना सुरू होत असल्याने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेची आर्थिक नाडी समजला जातो. सदरचा कारखाना सुरु झाल्यानंतर आसपासच्या दहा ते पंधरा गावातील बाजारपेठ, उद्योग, व्यवसाय यांची आर्थिक उलाढाल होते. कारखान्यातील कामगार, वाहनधारक, ऊस वाहतूकदार, ऊसतोड कामगार, मजूर यांचेही आर्थिक उत्पन्न वाढून परिसरातील लोकांची आर्थिक प्रगती होते. कारखाना पाच ते सहा वर्ष बंद असल्यामुळे परिसरातील उद्योग व्यवसायीक, व्यापारी, कामगार, वाहन मालक, ऊसतोड मजूर, स्थानिक नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली होती. सदरचा कारखाना अनंत अडचणीतून चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेला आहे. सदरच्या कारखान्याचे थकित सभासदांचे ऊस बिलाचे पैसे अडकलेले असल्याने छोटे-मोठे शेतकरी ऊस देण्यासाठी तयार होत नाहीत. कारखाना सुरू झालेला आहे, कारखान्याचे गाळप होणे गरजेचे आहे, यासाठी मोहिते पाटील गटातील समर्थकांनी साथ देऊन आपला स्वतःचा व नातेवाईकांचा ऊस गाळपासाठी दिल्यास चार ते साडेचार लाख टन उसाचे गाळप होऊ शकते. कारखान्याच्या बॉयलर पूजन व मोळी पूजन समारंभातील मान्यवर मोहिते पाटील यांच्या साखर कारखाने, दूध संस्था, कुकूटपालन, खरेदी-विक्री, मार्केट कमिटी, शिक्षण संस्था, व इतर संस्थातील आजी माजी संचालक व त्यांचे नातेवाईक यांनी जरी श्री शंकर सहकारी साखर कारखाना गाळपासाठी साथ दिली तर निश्चितपणे कारखान्याच्या गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng