सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंतीदिनी दिव्यांग बांधवांना दिलासा मिळणार.

विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्यांची दोन तास बैठक संपन्न.

अकलूज ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील उर्फ काकासाहेब यांच्या दि. 14 जानेवारी 2022 जयंतीचे औचित्य साधून अपंग बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेऊन दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम असल्याने दिव्यांग बांधवांना सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीदिनी दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्राचे युवा नेते विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिवरत्न बंगला येथे दोन तास बैठक संपन्न झाली. यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषद सदस्या कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, उपसभापती प्रतापराव पाटील, अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद जामदार, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्था तरंगफळचे संस्थापक अध्यक्ष व माळशिरस तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर, विजयसिंह मोहिते पाटील बहुउद्देशीय सेवाभावी अपंग संस्था अध्यक्ष शहाजीराव माने देशमुख, अपंग जनता दल राज्य उपाध्यक्ष विजयकाका कुलकर्णी, पिंटू भोसले, दत्तू निकम, मनोहर गायकवाड, सुभाष पवळ, पुंडलिक खरात, नानासो काळे आदी अपंग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

युवा नेते आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिव्यांगांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पदाधिकारी यांनी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सांगितल्या. सर्व विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. अपंगांच्या अडचणी सोडवून दिव्यांगांना वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिले. दिव्यांगांना महत्त्वाचे असणारे यूडी आयडी कार्ड, सर्टिफिकेट म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अकलूज, नातेपुते, माळशिरस येथे करण्यात येणार आहे. तसेच तीन चाकी सायकली, कानाच्या मशिनी, कुबड्या याचेही वाटप करण्यात येणार आहे. वयोवृद्ध व ज्येष्ठ यांना चष्म्याचे वाटप केले जाणार आहे. दिव्यांगांच्या पाच टक्के निधी अनेक ग्रामपंचायती यांनी वाटप केलेला नाही, त्या निधीविषयी सुद्धा चर्चा झाली. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली असल्याने दिव्यांग बांधव यांनी समाधान व्यक्त केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर व मित्रपरिवार यांचा तिरुपती बालाजी दौरा भक्तिमय प्रवासाने संपन्न
Next articleमहालक्ष्मी वस्त्रदालनाचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here