आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायत नगरपरिषद रणनिती आखण्यासाठी बैठकीची आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
आगामी होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद माळशिरस महाळुंग नातेपुते नगरपंचायत व अकलूज माळेवाडी नगरपरिषद निवडणूक २०२२ संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका आढावा बैठक मंगळवार दिनांक 5 10 20 21 रोजी दुपारी एक वाजता संत सावता माळी मंदिर खुडूस पुणे पंढरपूर रोड येथे होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर यांनी दिली पुढे बोलताना अजितभैया बोरकर म्हणाले आगामी येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद,नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक २०२२ संदर्भात शेतकऱ्यांचे दैवत खा.राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वाभिमानी चे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुक्यातील संघटनेची आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील व तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी संघटनेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी उपस्थित राहावे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng