हिन्दुस्तान फिड्स कंपनीच्यावतीने तांबवे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वह्या वाटप

वाघोली (बारामती झटका)

दि‌. १२ ऑगस्ट २०२२ रोजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबवे या ठिकाणी ‘हिन्दुस्तान फिड्स अर्थात बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. अतिशय दर्जेदार अशा ८५८ वह्या कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

याप्रसंगी कंपनीचे विस्तार अधिकारी डॉ. रसाळ साहेब, एरिया इन्चार्ज श्री. हरीश पिसाळ सर, सेल्स ऑफिसर श्री. विष्णू मिसाळ सर यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. आदरणीय डॉ. रसाळ साहेब यांनी कंपनीची वाटचाल, कंपनीचा इतिहास आणि कंपनी जपत असलेली सामाजिक बांधिलकी याबाबत सविस्तर मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास कसा साधावा, याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेतर्फे आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री‌. भिंगे सर, शिक्षक वृंद तसेच शिवदत्त बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

बारामती कॅटल फिड्स कंपनीतर्फे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासामध्ये सुमारे ३६ हजार रुपयांच्या ८५८ वह्या देऊन मोलाचे सहकार्य शाळेला लाभल्याबद्दल कंपनी व आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे उप शिक्षक श्री‌. उमाजी माने यांनी आभार मानले.
सदर उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून कंपनीचे आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजन संजीवनी अभियानामध्ये सोलापूर जिल्ह्यात यशवंतनगर प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम तर माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यात प्रथम
Next articleदुसऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here