ह.भ.प. अमोल सुळ महाराज, मोरोची यांचे माळशिरसचे ज्येष्ठनेते स्व. शिवाजीराव काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ कीर्तनाचा कार्यक्रम.

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, माजी सरपंच शिवाजीराव निवृत्ती काळे उर्फ आप्पा यांचे प्रथम पुण्यस्मरण.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माळशिरस शहराचे माजी सरपंच ज्येष्ठनेते स्वर्गीय शिवाजीराव निवृत्ती काळे उर्फ आप्पा यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दि. 07/10/2021 रोजी आहे. त्यानिमित्त सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये ह.भ.प. अमोल सुळ महाराज, मोरोची यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
माळशिरसचे ज्येष्ठनेते शिवाजीराव काळे उर्फ आप्पा यांचे गतवर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.
माळशिरस शहराच्या जडणघडणीमध्ये आप्पांचा सिंहाचा वाटा आहे. प्रतिकूल परिस्थितीत गावचा विकास त्यांनी केलेला आहे. त्या काळामध्ये अनेक विकासाच्या योजना सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबविलेल्या होत्या. त्यांनी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य म्हणून पाच वर्ष काम केलेले होते. माळशिरस ग्रामपंचायतचे दहा वर्ष सरपंच पददेखील भूषविले होते. तसेच त्यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे संचालक पदाचा वीस वर्ष पदभार सांभाळला होता. आप्पा माळशिरसमधील सर्वसामान्य जनतेचा आधार बनले होते. प्रतिकूल परिस्थितीत जनहिताच्या अनेक योजना राहिलेल्या होत्या. अडीअडचणीमध्ये गोरगरीब व सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे होते. आप्पांच्या मृत्यूने सर्वसामान्य जनतेचा आधारवड कोसळलेला होता. आप्पांची उणीव माळशिरसकरांना नेहमी जाणवत होती. आप्पांचे दुःखद निधन झाल्यापासून काळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काळ कोणासाठी थांबत नाही, बघता बघता गुरुवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुश्राव्य किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे कोरोना नियमाचे पालन करून आयोजन केलेले आहे. तरी पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन काळे परिवार यांचेकडून करण्यात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमॉडेल विविधांगी प्रशालेत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टीने व टाळ्या वाजवून स्वागत
Next articleमाळशिरस तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती कर्मवीर कै.बाबासाहेब माने पाटील यांची ५३ वी पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here