२०१४ नंतर देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता रविकांत वरपे

मुंबई (बारामती झटका)

बँकांच्या कार्यपद्धतीतच मोठा घोटाळा सुरू आहे. कामकाजात पारदर्शकता उरलेली नाही कारण, ज्या खातेदारांची कर्जे माफ केलीत, त्यांची नावे उघड करायला बँका स्पष्ट नकार देत आहेत. जनसामान्यांच्या ठेवींवर कोण दरोडा टाकतोय हे आम्हाला समजलेच पाहिजे.

या प्रकारचे ताजे उदाहरण आहे, देशातील चौथी सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक असलेली कॅनरा बँक. या बँकेने मागील ११ वर्षांमध्ये कर्ज बुडवणाऱ्या खातेदारांचे सुमारे १,२९,०८८ कोटी रुपयांचे कर्ज राईट ऑफ केले आहेत. या खातेदारांनी कमीत कमी १०० कोटी व त्याहून अधिक रकमेची कर्ज उचलली होती. आता आपल्याला माहितीय की, सामान्य माणसाला १०० कोटींची कर्ज मिळत नसतात. मग ही कर्ज घेऊन ती बुडवणारे लोक आहेत तरी कोण ? माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर यांनी या संदर्भात माहिती बँकेकडे मागितल्यावर बँकेने ही माहिती द्यायलाच नकार दिलाय. उत्तर म्हणून बँकेने श्री. वेलणकर यांना कळवले की, “आपण संबंधित माहिती ज्या प्रकारे मागवली आहेत, त्या प्रकारे ती ठेवण्यात आलेली नाही.” सन २०१३ – २०१४ ते सन २०२१ – २०२२ या कालावधीतील हा प्रकार आहे.

यावरून हे स्पष्ट होत आहे की, सन २०१४ नंतर या देशात खूप काही बिघडले आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. बँकिंग सिस्टम जी या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती, तो कणा आतून पोखरण्यात येतोय. आपल्या बँकांमधील ठेवी सुरक्षित आहेत का ? याची खात्री करण्याची वेळ येऊ शकते, ही भीती निर्माण झाली आहे. सावध ऐका पुढल्या हाका! – रविकांत वरपे (प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश)

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या आसमंतातील एक ध्रुव तारा निखळला – आ. ॲड. अशोक रावसाहेब पवार
Next articleपीएम किसान – ईकेवायसी करा व पीएम किसान प्रलंबीत लाभार्थ्यांनी किसान क्रेडीट कार्डचा लाभ घ्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here