Uncategorizedक्रीडाताज्या बातम्यादेश

करमाळ्याचा शिवम चिखले नॅशनल रँकिंग आर्चरी स्पर्धेत देशात आठवा #नॅशनल रँकिंग आर्चरी स्पर्धा #एकलव्य अकॅडमी, मोडनिंब #करमाळा #शिवम राजेंद्र चिखले

करमाळा (बारामती झटका)

शिलॉंग येथे झालेल्या नॅशनल रँकिंग आर्चरी स्पर्धेत एकलव्य अकॅडमी मोडनिंब चा तिरंदाज व मूळचा करमाळा तालुक्यातील रायगावचा रहिवासी असलेला शिवम राजेंद्र चिखले याने पहिल्या दिवशी ३१८ आणि ३२२ स्कोअर प्राप्त करून राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेत पहिल्या दिवशी आठवे स्थान निश्चित केले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी इलिमेशनमध्ये शिवम राजेंद्र चिखले याने राजस्थान, गुजरात, दिल्ली अशा तिरंदाजांना पराभूत करून सुवर्णपदक प्राप्त केले. असे सुवर्णपदक प्राप्त करणारा, हा सोलापूर जिल्ह्यातील एकमेव तिरंदाज आहे. तो सध्या एकलव्य अकॅडमी, मोडनिंब येथील विठ्ठल भालेराव सर यांच्या अकॅडमीमध्ये सराव करत आहे. आणि तो सध्या शांतिनिकेतन विद्यामंदिर मोडनिंब या ठिकाणी इयत्ता नववी मध्ये शिकत आहे.

इतक्या लहान वयात त्याने नॅशनल आर्चरी टूर्नामेंटमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. त्याबद्दल त्याला यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोदजी चांदोरकर सर, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास रणदिवे सर, महाराष्ट्र संघटनेच्या सहसचिव सोनल बुंदिले मॅडम, कोषाध्यक्ष रंगराव साळुंखे सर, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक अभिजीत दळवी सर, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक प्रवीण सावंत सर यांनी त्याचे अभिनंदन केले.

याबाबत त्याचे वडील राजेंद्र चिखले बोलताना म्हणाले की, लहानपणापासूनच त्याला तिरंदाज खेळाची आवड होती. आजचा त्याचा परफॉर्मन्स पाहता तो भावी काळात नक्की ऑलिंपिकमध्ये भारताचे नेतृत्व करेल, असा मला विश्वास आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort