ताज्या बातम्याशैक्षणिक

महाराष्ट्र प्रबोधिनी नैतिकता व मूल्यांची जपणूक करणारे अधिकारी घडवत आहे – मा. इंद्रजीत देशमुख

बारामती (बारामती झटका)

महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती आयोजित अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षेतील ७२ यशवंतांचा भव्य सन्मान सोहळा बारामती येथे पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी मा. इंद्रजीत देशमुख (मुख्य कार्यकारी अधिकारी) तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा. सदस्य डॉ. अरुण अडसूळ सर अध्यक्षस्थानी होते. यावेळेस सन्माननीय उपस्थितीमध्ये श्री. राजेंद्र केसकर सर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री. आनंद भोईटे सर अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अकॅडमी चे संचालक विजयराज चंदनकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी मधून पोलीस उपनिरीक्षक (३२), राज्य विक्रीकर निरीक्षक (४), कृषी अधिकारी (२३), सहाय्यक अभियंता (७) तसेच महसूल सहाय्यक (६) या पदी यशवंतांची निवड झाली असून अकॅडमीचे २०२१-२०२२ चे निकाल अजून राहिलेले आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंद्रजित देशमुख सर म्हणाले की, संविधानात्मक नैतिकता व मूल्यांची जपणूक करणारे अधिकारी घडले पाहिजेत. अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक कामामुळेच राज्याची प्रगती होत असते. अधिकारी नाही तर लोकसेवक ही सकारात्मक भावना बाळगून संविधान व कायदा प्रमाण मानून काम केले पाहिजे.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉ. अरुण अडसूळ सर म्हणाले की, प्रशासकाच्या भूमिकेत जाताना आपल्याकडे प्रमुख तीन कौशल्य असण्याची गरज असते. एक, आपल्या भूमिकेशी संबंधित कायदे आणि इतर तांत्रिक बाबी ज्ञात असणे आवश्यक असते. दोन, मानवतावाद हा प्रत्येक प्रशासकाच्या निर्णयातून व कृतीतून प्रतिबिंबित झाला पाहिजे. तीन, आपण निवडलेल्या कार्यक्षेत्राची संपूर्ण संकल्पना आपणाला ज्ञात असणे गरजेचे असते.

यावेळी बोलताना राजेंद्र केसकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणाले, ज्यावेळी मी अकॅडमीच्या उद्घाटनासाठी गेलो होतो त्याच झुडपाचे आज मोठा वटवृक्ष महाराष्ट्र प्रबोधिनी झाला आहे. तसेच पुढील वर्षी नक्कीच शंभर विद्यार्थी या अकॅडमीतून यशस्वी होतील, असा विश्वास आहे.

यावेळी यशवंतामधून PSI अक्षय पवार, श्रीकृष्ण काळे, दादाहरी वनवे यांनी मत मांडताना परीक्षेची तयारी व अभ्यासाचे नियोजन याविषयी नेमके मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रबोधिनी टीमची रिझल्ट विषयी असणारी तळमळ व्यक्त केली. आपल्या यशामध्ये विजयराज चंदनकर सरांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

विद्यार्थ्यांच्या निवडीनंतर पालकांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहणे अत्यंत आनंददायी असते. त्यासाठीच महाराष्ट्र प्रबोधिनी यशवंताच्या सहकुटुंब सत्काराचे नियोजन करते. मागील दोन वर्षांपासून जे अधिकारी घडविण्यासाठी कष्ट घेतले होते, मागील महिन्यापासून विद्यार्थी व पालकांची प्रतिक्रिया बघून मनस्वी समाधान वाटत आहे व ग्रामीण भागातील मुलांसाठी महाराष्ट्र प्रबोधिनी नेहमीच तयार असेल, असे मत महाराष्ट्र प्रबोधिनीचे संचालक विजयराज चंदनकर सर यांनी मांडले.

महाराष्ट्र प्रबोधिनी मधील यशवंत तालुका कृषी अधिकारी विद्यार्थी राहुल नकाते (महाराष्ट्रातून पहिले), राहुल सोलनकर, विठ्ठल देशमुख, दत्तात्रय शिंदे, सदानंद लोमटे, पंकज लोंढे, सोमनाथ पिंजारी, स्नेहल थेऊरकर, प्रवीण पुरी.

मंडळ कृषी अधिकारी पुढील प्रमाणे – श्रीराज देशमुख, अक्षय गवांदे, सुनील कोरडे, प्रकाश मोहिते, अतुल मते, अमित भोसले, कैलास शिंदे, अजित वासेकर.

पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेले विद्यार्थी अमोल गोंडे, अक्षय पवार, विजय महाडिक, विक्रम काळे, शरद भरणे, रणधीर रोकडे, अजयसिंह भाळे, आनंद हंकारे, प्रशांत जाधव, सुवर्णा गायकवाड, शितल उतेकर, रूपाली गरगडे, आरती जाधव, रूपाली कदम, करिष्मा वनवे, वैशाली कोळी, पूजा मदने, ज्योती शिंदे, दादाहरी वनवे, महेश जगताप, अक्षय शिंदे, जयप्रकाश घागरे, निखिल सरडे, भाऊसाहेब गोपाळघरे, अजिंक्य इथापे, अजय मिसाळ, विशाल पोळ, स्वप्निल लोंढे, संकेश्वर अहिवळे, स्वप्निल बनकर, भगवान गोडसे, नितेश सानप, प्रदीप पवार, कैलास सरकटे.

सहाय्यक अभियंता या पदावरती प्रज्वल भामुद्रे, रूपाली माने, अक्षय कोकरे तर भूकर मापक संकेत बोंद्रे, तसेच महसूल सहाय्यक पदी श्रीकृष्ण काळे, ज्योती चव्हाण, अक्षय येडे, तुषार जाधव तसेच पोलीस सुधीर कांबळे, मलिक शेख, नाजमीन शेख, सुनील खाडे, सूर्यकांत पवार, सुरज म्हेत्रे, दीपक पांचाळ, आकाश पवार, प्रदीप सलामपुरे, सागर जावीर, अनिकेत दराडे, वैभव चव्हाण, ऋतुजा शिरतोडे, चैतन्य ढवळे, दिनेश गावडे, युवराज निकम या विद्यार्थ्यांची निवड झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort