Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

साखर कारखानदारांनी टांगले मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तारले…

गतवर्षीपेक्षा दुप्पट नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकरी आनंदात !!!

करमाळा (बारामती झटका)

करमाळा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते. पण या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या पद्धतीने पंचनामे होऊन आज करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ५५ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला तालुक्यातील मकाई साखर कारखाना, भैरवनाथ साखर कारखाना व कमलाई साखर कारखाना या तिन्ही साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकाचे गेली दोन महिन्याचे पहिले बिल सुद्धा दिलेले नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. यामुळे कारखानदारांनी टांगले मात्र, मुख्यमंत्र्यांनी तारले, अशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

यावर्षी नुकसान भरपाई देताना शिंदे-फडणवीस सरकारने एक हेक्टरची मर्यादा दोन हेक्टरपर्यंत वाढवली. शिवाय नुकसान भरपाईची रक्कम दुपटीने वाढवली. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई समाधानकारक मिळाली आहे. खरीप हंगामात पिके घेणारे शेतकरी जिराईत भागातील आहेत. रब्बी हंगामात सुद्धा अवकाळी पावसामुळे हरभरा, गव्हाचे हवे तसे उत्पन्न आले नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता मात्र, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला आहे. ही रक्कम डायरेक्ट मनी ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी तत्त्वावर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे या निधी वाटपात वशिलेबाजी टाळली गेली आहे. दरम्तायानत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे तहसीलदार समीर माने व त्यांच्या सर्व टीमचे शिवसेनेने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला

ऊस कारखानदारांनी ऊस गाळपात गेल्यानंतर १४ दिवसाच्या आत एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असा कायदा असताना तीन कारखान्यांनी जवळपास शेतकऱ्यांचे १३० कोटी रुपये अडकून ठेवले आहेत. प्रमाणे या कारखान्यावर साखर आयुक्तांनी कारवाई करणे गरजेचे असताना साखर आयुक्त सुद्धा तोंडाला चिकटपट्टी लावून बसले आहेत
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी करूनसुद्धा त्याची दखल घेतली गेलेली नाही.

दीड एकर कांद्याचे नुकसान अतीवृष्टीने झाले होते. आज माझ्या अकाउंटवर सोळा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत. या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस मदत शेतकऱ्यांना केली आहे व दिलेला शब्द पाळला आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऋणी असून यापुढील काळात आम्ही सर्व शेतकरी शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत – मारुती भोसले, कांदा उत्पादक शेतकरी, कुंभेज
शासनाच्या आदेशानुसार कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी आदी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर केला. शासनाने ही सर्व अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करून आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. काही गावांच्या याद्या प्रलंबित असून राहिलेल्या सुद्धा सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे. – समीर जी. माने, तहसीलदार, करमाळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री असून यावर्षी कधीही मिळाली नाही एवढी अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. करमाळा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला आहे त्यांनाही पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांचे खाते नंबर किंवा आधारकार्ड नंबरमध्ये चुका असतील अशांचे पैसे प्रलंबित असून त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी खात्याशी संपर्क साधावा. – महेश चिवटे, जिल्हाप्रमुख, सोलापूर
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort