उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचा सातारा जिल्हा दौरा कार्यक्रम जाहीर.

माजी खासदार फलटण तालुक्याचे भगीरथ लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या स्वप्नातील नीरा-देवधर उजवा कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामाचा शुभारंभ ठरला…
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शेतकरी मेळाव्यात सातारा व सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर कोण उपस्थित राहणार पहा…
फलटण (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा बुधवार दि. १७ जानेवारी २०२४ रोजी सातारा जिल्हा दौरा कार्यक्रम उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालयाचे कार्यक्रम अधिकारी निलेश श्रींगी यांनी जाहीर केलेला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार फलटण तालुक्याचे भगीरथ लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या स्वप्नातील नीरा देवधर उजवा कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामाचा शुभारंभ ठरला. स्वर्गीय पित्याची, सर्वसामान्य जनतेची इच्छा पूर्ण करणारे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आलेले असल्याने ‘शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी’ या म्हणीचा प्रत्यय आलेला आहे. ‘आपल्या हिता असे जो जाणता, तयाची कुळी कन्या, पुत्र होती, जे सात्विक पुत्र व्हावा ऐसा, त्याचा दुष्काळी भागात त्रिलोकी झेंडा’, अशी परिस्थिती माढा लोकसभा मतदारसंघातील निरा देवधर कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत आहे.

कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता मेघदूत निवासस्थान मुंबई येथून मोटारीने राजभवन मलबार येथील हेलिपॅडवरून कराड, जि. सातारा कडे आगमन होणार आहे. कराड येथील विमानतळ येथे आगमन होऊन मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड येथे आगमन होऊन कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव २०२४ या ठिकाणी जाणार आहेत.

मोटारीने हेलिपॅड कराड विमानतळावरून काळज ता. फलटण येथे आगमन होऊन मोटारीने काळज तालुका फलटण येथील कार्यक्रम स्थळी जाऊन निरा देवधर उजवा कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामाचा शुभारंभ करून मोटारीने यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण येथे दु. ४ वा. जाहीर सभा करून मोटारीने फलटण हेलिपॅड येथून पुण्याकडे रवाना होणार आहेत. पुण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईकडे आगमन होणार आहे. उपमुख्यमंत्री यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.